‘मोहरा’ चित्रपटातील ही साधीभोळी दिसणारी अभिनेत्री प्लॅस्टिक सर्जरी नंतर आता दिसतेय इतकी हॉ-ट.. फोटोज होतायत व्हायरल..

आपल्या भारतीय समाजव्यवस्थेत आजही मनाने सुंदर असण्यापेक्षा सुंदर दिसण्याला जास्त प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते की त्याने सुंदर दिसावं. आता प्रत्येकाच्याच नशिबात सुंदर चेहरा नसतो. त्यामुळे सुंदर दिसण्यासाठी काही लोक अनैसर्गिकरित्या प्लास्टिक शस्त्रक्रियेचा आसरा घेतात.

आपल्या सामान्य लोकांच्या जीवनात ही बाब जरी अतिशय कमी प्रमाणात दिसत असली तरीही आपली चित्रपट सृष्टी म्हणजेच बॉलिवूड ही एक अशी इंडस्ट्री आहे जिथे अश्या घटना सर्रास घडताना दिसतात. ही इंडस्ट्रीच अशी आहे जिथे फक्त आणि फक्त दिसण्याला प्राधान्य दिले जाते.मग अशा वेळी या अभिनेत्र्यांकडे प्लास्टिक सर्जरीवाचून पर्याय नसतो.

वास्तविक प्लास्टिक सर्जरीने बॉलिवूडच्या बर्‍याच अभिनत्र्यांचं सौंदर्य आणखी सुंदर बनविले आहे. कारण बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सौंदर्याला किती महत्त्व दिलं जातं हे आपणास ठाऊकच आहे. बॉलिवूडमध्ये बर्‍याच अभिनेत्र्या अशा आहेत ज्या आता खुपच सुंदर दिसत आहेत, परंतु पूर्वी मात्र त्या इतक्या सुंदर नव्हत्या, मग त्यांनी प्लास्टिक सर्जरीचा मार्ग स्वीकारून हे सौंदर्य मिळवलं आहे.

पण आज आम्ही तुम्हाला 90च्या दशकातील अशा एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी अगोदर अतिशय सुंदर असून सुद्धा तिने प्लास्टिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. परंतु ती आधीच जास्त सुंदर दिसत होती असे अनेकांचे म्हणणे आहे. चला तर जाणून घेऊयात कोण आहे ही अभिनेत्री.

आम्ही बोलत आहोत अभिनेत्री पूनम झावर बद्दल. १९९४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मोहरा’ चित्रपटात अभिनेत्री पूनम झावर पहिल्यांदा दिसली होती. या चित्रपटात जरी ती मुख्य भूमिकेत नसली असली तरी तिच्या सौंदर्याची चर्चा मोठ्या प्रमाणात झाली होती. या चित्रपटात तिने सुनील शेट्टी सोबत काम केले आहे. पूनम या चित्रपटात अगदी साध्या भूमिकेत दिसली होती.

तिच्या या साध्या भूमिकेला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता, पण आता तीच पूनम खूपच बोल्ड आणि ग्लॅ म रस बनली आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास २५ वर्षे उलटून गेली आहेत आणि २५ वर्षांमध्ये पूनमच्या लूकमध्ये बरेच बदल झाले आहेत. आणि यासाठी तिने प्लास्टिक सर्जरीचा मार्ग स्वीकारला होता.

पूनम सध्या सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. तिचे बोल्ड फोटो सध्या सोशल मीडिया वर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांना हे फोटो खूपच आवडले आहेत. तर अनेकांना ही मोहरा मधील पूनम असल्याचा विश्वास देखील बसत नाहीये.

खरं तर पूनमने तिच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत मोहरा नंतर 2,3 चित्रपटच केले, त्यानंतर तिने बॉलिवूड सोडले, त्यानंतर तिने काही दिवस दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूड मध्ये ती शेवटची ‘ओह माय गॉड’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटामध्ये तिने राधे माँचं पात्र साकारले होते.

सध्या पूनम तिच्या फोटोशूट्समुळे अधिक चर्चेमध्ये असते. पूनमची काही अलीकडील छायाचित्रे शेअर करीत आहोत, ज्यात आपण तिचे नवीनतम रूप स्पष्टपणे पाहू शकाल. पण आज पूनम पुन्हा एकदा नवीन आणि चर्चेचा अवतार घेऊन परतली आहे. वास्तविक पूनम आता एक सुपर मॉडल बनली आहे आणि ती तिच्या ग्लॅम रस आयुष्याचा आनंद लुटत आहे.