साऊथ चित्रपटसृष्टी हादरली ! KGF मधल्या या कलाकाराचे दुःखद निधन

‘केजीएफ चॅप्टर 2’  हा साऊथ चित्रपट जगभरात धुमाकूळ घालत असतानाच, एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. ‘केजीएफ चॅप्टर 2’ मधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन झालं आहे. या अभिनेत्याचं नाव मोहन जुनेजा असं आहे. मोहन जुनेजा हे गेली अनेक दिवस आजारी होते.

त्यांच्यावर उपचारदेखील सुरु होते. परंतु आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्यामुळे मनोरंजनसृष्टीत शोककळा पसरली आहे. मूळात एक कॉमेडियन असणाऱ्या मोहन जुनेजा यांच्या अचानक जाण्याने सर्वानांच धक्का बसला आहे. या अभिनेत्याने एक कॉमेडियन म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली होती.

आपल्या निखळ अभिनयाने आणि दर्जेदार विनोदाने त्यांनी सर्वांनाच खळखळून हसवलं आहे. मात्र आज त्यांच्या जाण्याने सर्वच सुन्न झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मोहन जुनेजा हे गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर बेंगलोर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होतं. आज सकाळी 7 च्या दरम्यान उपचारादरम्यान त्यांचं निधन झाल्याचं समोर आलं आहे.

मोहन जुनेजा यांनी ‘केजीएफ चॅप्टर 2’मधून सर्वांचं मन जिंकलं आहे. या ब्लॉकबस्टर चित्रपटात त्यांनी पत्रकार आनंद यांच्या खबरीची भूमिका साकारली होती. त्यांनी फक्त तामिळच नव्हे तर तेलुगू, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केलं आहे. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी तब्बल 100 हुन अधिक चित्रपटांमध्र्य काम केलं आहे.

अनेक छोट्या-मोठ्या भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याला ‘चेतला’ या चित्रपटातून चांगली ओळख मिळाली होती. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचं आजही कौतुक केलं जातं.