फार कमी वयात मौनी रॉय कोट्यवधींची मालकीण

लहान वयातच अभिनयक्षेत्रात प्रवेश करून हळूहळू आपला जम या क्षेत्रात पुर्णतः बसवत टेलिव्हिजनच काय चित्रपटांतून सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री मौनी रॉय (Mouni Roy Highest Paid Actress) आज करोडोंची मालकीण आहे. एकता कपूरच्या मालिकांमधून (Ekta Kapoor Serials) काम करत करत मौनी रॉयनं टेलिव्हिजन क्षेत्रात नागिनपासून (Naagin) बिग बॉसपर्यंत (Big Boss) सर्वच ठिकाणी धुमाकूळ घातला आहे.

टेलिव्हिजनचा हा लोकप्रिय चेहरा चित्रपटांमधूनही प्रेक्षकांपर्यंत पोहचला आहे. अक्षय कुमारच्या गोल्ड (Akshay Kumar’s Film Gold) आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ब्रह्मास्त्र (Bramhastra) या चित्रपटातून मौनी रॉयनं आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. (bramhastra actress mouni roy birthday special do you know how much is her net worth)

आज मौनी रॉयचा वाढदिवस (Mouni Roy Birthday) आहे तेव्हा जाणून घेऊया शून्यापासून सुरूवात करत आज टीआरपी क्वीन ठरलेल्या मॉनी रॉयची नेटवर्थ (TRP Queen Mouni Roy Net Worth) किती आहे. मौनी रॉयचा जन्म 28 सप्टेंबर 1985 रोजी बिहार येथे झाला. मौनीची आई मुक्ती रॉय (Mouni Roy Mother Mukti Roy) आणि आजोबा शेखर रॉय (Grandfather Shekhar Roy) हेही लोकप्रिय स्टेज कलाकार आहेत.

मौनी रॉयनं मास कम्यूनिकेशनमधून (Mass Communication) आपलं शिक्षण पुर्ण केलं आहे. शिक्षण झाल्यानंतर 2007 पासून मौनी रॉयनं टेलिव्हिजन क्षेत्रात आपल्या करिअरची सुरूवात केली. क्यौंकी सास भी कभी बहू थी(Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi)  या मालिकेतून तिनं आपली छोटीशी भुमिकाही गाजवली आहे. त्यानंतर तिनं परत मागे वळून पाहिलंच नाही आणि एकापेक्षा एक सुपरहिट मालिका तिनं केल्या.

मौनी फक्त चित्रपट आणि मालिकांमधूनच नाही तर मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिरातींमधूनही दिसली आहे. त्याचबरोबर ती सोशल मीडियामधूनही खूप कमवते. तसेच तिचे म्यूझिक व्हिडीओही फार लोकप्रिय आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, मौनी रॉयची नेटवर्थ 40 करोडच्या आसपास आहे.

मौनी रॉय सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिच्या हॉट आणि रॉयल लुकचे सगळेच फॅन आहेत. तिला गाड्यांची खूप हौस आहे. तिच्याकडे करोंडोच्या किमतीच्या गाड्या आहे. तसेच मुंबईत तिचं दोन फ्लॅट्स आहेत. तिच्या मर्सिडिज जीएलएस 350 D (Mercedes 350 D) आणि मर्सिडिज बेंज ई क्लास (Mercedes Benz) या दोन महागड्या गाड्या आहेत.

मौनी रॉयनं याच वर्षी सुरज नांबियारशी (Mouni Roy Married to Suresh Lambachiyya) लग्न केले आहे. सध्या मौनी रॉयचं ब्रह्मास्त्र (Mouni Roy in Bramhastra) मधल्या तिच्या भुमिकवरून सर्वत्र कौतुक होत आहे.