‘रात्रीस खेळ चाले’ मधील सरिता आहे खऱ्या आयुष्यात शेवंतापेक्षा हॉट.. फोटोज पाहून थक्क व्हाल..

नुकताच ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वाने आपला निरोप घेतला आहे. या मालिकेतील अण्णा-शेवंता ही जोडी भन्नाट गाजली. शेवंताची भूमिका निभावणारी अपूर्वा नेमळेकर हिने तर आपल्या अदाकारीने सर्वांनाच भुरळ घातली आहे.

याच मालिकेतील आणखी एक स्त्री पात्र होतं जे खूप गाजलं ते म्हणजे सरिता. शेवंता या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट. शेवंता जितकी हॉट आणि बोल्ड तर सरिता तितकीच साधी आणि भोळसट पण तरीही लोकप्रिय. हि भूमिका निभावली आहे प्राजक्ता वाडये हिनं. आज तिच्याच कलाप्रवासाविषयी थोडंसं.

प्राजक्ताचा जन्म कोकणातला, कणकवलीचा. ती कोकणातच वाढली, शिकली. मालवणी हि तिची मातृभाषा. प्रत्येक कोकणी माणसाप्रमाणे तिला कलेची आवड. नृत्यात आणि अभिनयात तिला गती होती. तिची हि आवड तिच्या वडिलांना माहिती होतीच. ते स्वतः नाटक दिग्दर्शित करत असत. त्याचमुळे कलाक्षेत्रात आपल्या मुलीस आवड आहे, हे पाहून त्यांनी तिला नेहमीच प्रोत्साहन दिलं. किंबहुना अभिनयातील तिचा पहिला प्रवेश तिच्या वडिलांमुळे झाला, अशी आठवण तिने एका मुलाखतीदरम्यान सांगितली होती.

झालं असं होतं कि तिचे वडील एक नाटक बसवत होते आणि त्या नाटकातील एका मुलीने नाटकातून अचानक माघार घेतली. परिणामी ऐन क्षणी अभिनेत्री म्हणून कोणाला आणणार म्हणून त्यांनी लेकीला उभं केलं. प्राजक्ताने हि जबाबदारी उत्तमरीतीने निभावली आणि पहिल्याच फटक्यात सर्वोत्कृष्ठ अभिनयासाठी पारितोषिकही पटकावलं. पुढेही तिच्या वडिलांनी तिला एकांकिका आणि नाटकांतील भूमिकांसाठी प्रोत्साहनच दिलं.

पण केवळ नाटकात काम करून ती थांबली नाही. तर तिने शिक्षणही याच क्षेत्रात घेतलं. मुंबई विद्यापीठातून नाट्य शास्त्रात पदवी संपादन केली. सोबत तिने काही मालिकांमधून काम करणं सुरु केलं होतं. पण प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एखादी कलाकृती येते जी त्या कलाकाराच्या करियरला कलाटणी देणारी ठरते.

‘रात्रीस खेळ चाले’ हि मालिका, प्राजक्ताच्या करियरमध्ये मैलाचा दगड ठरली. या मालिकेमुळे महाराष्ट्रातील घराघरात अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली. या मालिकेच्या पहिल्या पर्वात तिने पोलीस ऑफिसर हि भूमिका बजावली होती. पण हि भूमिका छोटीशी होती. तर दुसऱ्या पर्वात तिने थेट ‘सरिता’ हि भूमिका बजावली. अर्थात सरिता हि भूमिका आधीच्या भूमिकेपेक्षा जास्त वेळ चालली. या मालिकेसोबतच तिने गर्ल्स हॉस्टेल या मालिकेतही काम केल आहे.

मालिकांसोबत तिने चित्रपटातही अभिनय केला आहे. तिचा ‘दिशा’ हा चित्रपट गाजला. यात तिने एका दिव्यांग व्यक्तीची भूमिका बजावली होती. याचसोबत ‘हिरकणी’ या चित्रपटात तिची छोटीशी भूमिका होती. तिचा तिला खूप आनंद झालेला दिसला. कारण एरवी सोशल मिडीयापासून चार हात लांब राहणाऱ्या प्राजक्ताने खास या शुटींगचे फोटोज चाह्त्यांसोबत शेअर केले होते. व्यावसायिक चित्रपटांसोबत ‘पर्सा’ हि शॉर्ट फिल्महि तिने केली आहे. यात एका आईची भूमिका तिने बजावली होती.

पण इतक्या निरनिराळ्या भुमिका साकारणं सोप्प नसतं, हे खरं. पण तिची अभिनयाची आवड आणि मेहनत घेण्याची वृत्ती यांमुळे हे शक्य झालं असणार. तिच्या याच प्रयोगशिलतेमुळे येत्या काळातही ती विविध भूमिकांतून आपल्या भेटीस येईल हे नक्की.