‘राम तेरी गंगा मैली’मध्ये बोल्ड सीन देणाऱ्या अभिनेत्रीला आता ओळखणं झालंय कठीण, पहा तिचे फोटो

ऐंशीच्या दशकात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मंदाकिनीने वयाच्या 16 व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मंदाकिनीचे खरे नाव आहे यास्मिन जोसेफ. या यास्मिनला खरी ओळख मिळाली ती राज कपूर यांच्या ‘राम तेरी गंगा मैली’ या सिनेमाने. या चित्रपटातील तिने दिलेल्या बोल्ड सीनची आजही चर्चा होते.

पहिला चित्रपट सुपरहिट ठरल्यामुळे मंदाकिनीला बॉलिवूडमधून मोठ्या दिग्दर्शकांकडून चित्रपटासाठी ऑफर येऊ लागल्या. त्यानंतर तिने भरपूर चित्रपटांमध्ये काम केले. पण तिचा दुसरा चित्रपट एवढा हिट नव्हता जेवढा तिचा पहिला चित्रपट सुपरहिट होता तरी देखील प्रेक्षकांनी तिला भरपूर प्रतिसाद दिला.

‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातील अभिनेत्री मंदाकिनीला 1994-95 साली दुबईतील शारजाहमध्ये भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यादरम्यान अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबत पाहिले होते. दोघांचे फोटो व कित्येक कथा चर्चेत आल्या होत्या. मात्र मंदाकिनी हिने नेहमीच या वृत्ताना दुजोरा दिला नाही.

मात्र 1996 साली प्रदर्शित झालेला चित्रपट जोरदारसोबत तिचे करियर संपुष्ठात आले. असेही बोलले जाते की दाऊदमुळेच मंदाकिनीला सिनेमात काम मिळत होते. बदनामीमुळे तिला काम मिळणं कमी झाले होते.

1990 मध्ये प्रसिद्ध डॉक्टर कग्यूर टी. रिनपोचे ठाकुर यांच्यासोबत तिने लग्न केले. सध्या ती पतीसोबत मुंबईत वास्तव्यास आहे. येथे ती तिब्बती हर्बल सेंटर चालवते. दलाई लामा यांना ती फॉलो करते. याशिवाय ती योगाही शिकवते.

1991 मध्ये देशवासी आणि 1996मध्ये जोरदार या सिनेमात मंदाकिनी झळकली.

आपल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या पहिल्याच चित्रपटांतून मंदाकिनी रातोरात सुप्रसिद्ध झाली. त्यानंतर मंदाकिनीला मागे वळून बघावं लागलं नाही. एकामागोमाग एक सुपरहिट चित्रपट तिच्या वाट्याला आले. अशातच दाऊदची नजर तिच्यावर पडली आणि तो तिच्या प्रेमात वेडा झाला. त्याने तिला आपल्या जाळ्यात ओढून घेतले.

मंदाकिनी ही दाऊदची पत्नी होती की प्रेयसी होती याबद्दल बर्‍याच चर्चा झाल्या. केवळ दाऊद किंवा मंदाकिनीच ही वस्तुस्थिती सांगू शकतील. पण एक गोष्ट खरी आहे की मंदाकिनी दाऊदसोबत दुबईतच राहिली आणि तिने निव्वळ काही पैसे आणि प्रसिद्धीसाठी दाऊदसारख्या भयानक गद्दारांशी संबंध ठेवल्याची खंत आजही तिच्या चाहत्यांमध्ये आहे.

जोरदार हा तिच्या करिअरमधील शेवटचा सिनेमा ठरला.