मलायका अरोराच्या ड्रेसने केला घात, कारमध्ये बसतानाच पॅन्ट फा…

बॉलिवूडमधील आयटम साँग गर्ल मलायका अरोरा सध्या काय करते असा प्रश्न जर कुणी विचारला तर उत्तर द्यायला विचार करावा लागेल. पण सध्या सिनेमापासून लांब असूनही मलायका नेहमीच चर्चेत असते. मलायका कोणत्या लुकमध्ये कुठे दिसेल याचा काही नेम नाही. जिम लुक असो किंवा एअरपोर्ट लुक, तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

गेल्या महिन्यात तिला अपघात झाला होता. त्यानंतर आता मलायका बाहेर पडत आहे. तिच्या कपाळावरील अपघाताचा व्रण दाखवणारा फोटो तिने शेअर केला होता. आता मलायकाकडे नजरा वळल्या आहेत त्या तिच्या खास ड्रेसमधल्या लुकमुळे. पण या ड्रेसने ऐनवेळी तिला धोका दिला.

मलायका अरोरा

मलायका अरोराची स्टाइल म्हणजे हटके असणार हे आता समीकरणच झालंय. नुकतीच ती निऑन रंगातील ट्रॅकसूटमध्ये दिसली. या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती. निऑन रंगातील ट्रॅकसूट आणि गुलाबी रंगाच्या कॅपमध्ये आलेल्या मलायकावर फोटोग्राफर्सनी कॅमेरे रोखले. कारपर्यंत जात असताना तिने हात दाखवून स्माइलही केली.

पण कारमध्ये बसत असतानाच अत्यंत पारदर्शी असलेल्या ट्रॅकसूटमधून चाहत्यांना बरच काही दिसलं. कारमध्ये बसताना त्या ड्रेसमुळेच मलायका अवघडल्याचं दिसत होतं. हा व्हिडिओ व्हायरल होताच चाहत्यांनी तिच्या लुकवर नाराजी व्यक्त केली. एक नेटकरी असं म्हणतोय की ड्रेसचा इतका भडक रंग अजिबात आवडला नाही.

तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने असं म्हटलं आहे की ड्रेस इतका पारदर्शी आहे की तिने तिच्या हिप्सवर केलेले प्रयोग दिसत आहेत. मलायका, तुला या ड्रेसमध्ये नीट चालताही येत नाही अशीही कमेंट एका चाहत्याने केली आहे. मलायकावर अशी ही काही पहिली वेळ नाही. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरच्या लग्नासाठी जाताना तिच्या टाइट फिटिंग ड्रेसने धोका दिला होता.

कोणताही सिनेमा हातात नसतानाही मलायका फोटोग्राफर्सचं लक्ष वेधून घेत असते. गेल्या महिन्यात तिच्या कारला अपघात झाला होता. त्यानंतर ती घरी विश्रांती घेत होती. मलायका ही बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत असलेल्या नात्यामुळेही चर्चेत असते. अपघातानंतर तिची चौकशी करण्यासाठी अर्जुन तिच्या घरी गेला होता तो व्हिडिओही व्हायरल झाला होता.