माधुरी दीक्षित बॉलिवूडवर अनेक वर्षं अधिराज्य गाजविले आहे. धकधक गर्लने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. तिने आपल्या डान्सने आणि अदांनी सर्वांनाच मदहोश करते. माधुरीची प्रचंड लोकप्रियता असून तिचे फॅन्स जगभरात आहेत.
माधुरीने नुकताच आपला 54 वा वाढदिवस साजरा केला आहे. माधुरी दीक्षितला तिच्या कारकीर्दीत एका नवीन गोष्टीला सामोरे जावे लागले होते. तिला एका चित्रपटाचा करार साइन करताना लग्नापूर्वीच नो प्रे-ग्नेंसी क्लॉज साइन करावा लागला होता.
हा किस्सा आहे खलनायक चित्रपटाच्या दरम्यानचा. या चित्रपटात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाच्यावेळी संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या अफेअरच्या चर्चांना ऊत आले होते.
ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याच्या बातम्या मीडियात येत होत्या. या चित्रपटाच्यावेळी माधुरीचे लग्न झाले नसले तरी याच अफेअरच्या चर्चांमुळे सुभाष घई यांनी माधुरीकडून नो प्रेग्नन्सी क्लॉज साईन करून घेतला होता.
संजय आणि माधुरीने चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान लग्न केले आणि माधुरी गरोदर राहिली तर चित्रपटाच्या चित्रीकरणावर परिणाम होईल असे टेन्शन त्यांना आले होते असे म्हटले जाते.
माधुरीने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला आहे. ऐंशी-नव्वदीच्या दशकात तिने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. दिल, हम आपके है कौन, दिल तो पागल है यांसारख्या चित्रपटात माधुरी झळकली आणि सुप्रसिद्ध झाली.
अनेक चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी तिला पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. माधुरीच्या अभिनयाइतकेच तिच्या सौंदर्याचे देखील कौतुक होते. तिने आज वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी ती तितकीच सुंदर दिसते.
माधुरी दीक्षित सध्या डान्स दीवाने ३ या डान्स रिएलिटी शोमध्ये परीक्षकांच्या भूमिकेत पहायला मिळते आहे.

.