माधुरीने शेअर केलं तिच्या कायम जवान दिसण्यामागचं रहस्य.. रोज दोन वेळा ‘हे’ घेतल्यामुळे आहे जवानी टिकून..

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या माधुरी दीक्षितने बॉलिवूडवर अनेक वर्षं राज्य केले. प्रेक्षकांच्या या लाडक्या माधुरीने एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले. दिल, दिल तो पागल है, हम आपके है कौन, बेटा, पुकार यांसारख्या अनेक चित्रपटात माधुरीने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आणि तिच्या या भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर देखील घेतल्या

माधुरीला बॉलिवूडची डान्सिंग क्वीन म्हणून देखील संबोधले जाते. तिच्या प्रत्येक सिनेमात तिचा एक जबरदस्त डान्स परफॉर्मन्स हा ठरलेलाच असतो. 1984 मध्ये रिलाज झालेला माधुरी ‘अबोध’ हा पहिला सिनेमा फ्लॉप ठरला होता. काही फ्लॉप सिनेमे दिल्यानंतर ‘तेजाब’ सिनेमाद्वारे माधुरीला पहिल्यांदा यशाची चव चाखायला मिळाली.

1988 साली एन चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब’ या चित्रपटात माधुरीने अनिल कपूर यांच्यासोबत अभिनय केला होता. या सिनेमातील ‘एक दो तीन…’ या गाण्याने माधुरीला एका रात्रीत स्टार बनवले. या सिनेमात वेस्टर्न डान्स करणे हे एक आव्हान असल्याचे माधुरीने म्हटले होते. परंतु हे गाणे तुफान गाजले व माधुरीने लाखो तरुणांचे हृदय जिंकले.

अभिनय आणि डान्स सोबतच माधुरी आणखी कोणत्या गोष्टी साठी प्रसिद्ध असेल तर ते म्हणजे या वयातही तिने टिकवून ठेवलेलं आपले सौंदर्य. सध्या ती चित्रपटांपासून दूर आहे. पण ती बर्‍याचदा सोशल मीडिया आणि रिअॅलिटी शो मध्ये दिसत असते. माधुरी दीक्षितने वयाची 53 वर्षे पूर्ण केली असतील, पण तरीही तिचे सौंदर्य आजही कायम आहे.

कदाचित ती आता तर आधीपेक्षा अधिक सुंदर दिसते. ती दिवसेंदिवस अधिक तरुण होत चालली आहे. हेच कारण आहे की चाहते वारंवार तिला तरूण राहण्यासाठी युक्त्या विचारतात. आता अलीकडे अभिनेत्रीने ही युक्ती चाहत्यांमध्ये शेअर केली आहे. तर मग जाणून घेऊया माधुरीच्या सौंदर्यामागे नेमकं काय रहस्य आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपले सौंदर्य रहस्य सांगत म्हटले की ती वेळोवेळी दोन प्रकारचे फेसपॅक वापरते. हा फेसपॅक तेलकट स्क्रीन टाळण्यासाठी वापरता येतो किंवा मग निर्जीव त्वचा पुन्हा फ्रेश करण्यासाठी. दोन्ही प्रकारे वापरला जाऊ शकतो. पुढे माधुरीने हा फेसपॅक तयार कसा करावा याबद्दल देखील सांगितले.

हे फेसपॅक तयार करण्यासाठी 1 चमचे ओट्स पावडर, 1 चमचे मध आणि दूध आणि गुलाबजल आवश्यक आहे. हे तीन घटक योग्य प्रमाणात मिसळा आणि पेस्ट तयार करा. पेस्ट तयार झाल्यावर चेहरा व्यवस्थित धुवा आणि त्यानंतर ही पेस्ट 20 मिनिटे चेहर्यावर ठेवा. अगदी सोप्या शब्दात माधुरीने आपल्या सुंदरतेचं रहस्य शेअर केलं

20 मिनिटांनंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा. अभिनेत्री म्हणते की ओट्स आणि मधमध्ये दाह प्रतिरोधक गुणधर्म आहे. ज्यामुळे चेहऱ्यावरील सूज आणि निस्तेजपणा कमी होतो. त्याचप्रमाणे जर त्वचा कोरडी असेल तर एक चमचे एलोवेरा जेल, एक चमचे दूध, एक चमचे मध, दोन थेंब आवश्यक तेल, हे सर्व एकत्र करून पेस्ट बनवा.

नंतर चेहरा आधी स्वच्छ धुवून घ्यावा आणि मग 15 ते 20 मिनिटांसाठी हा लेप लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. माधुरीचा असा विश्वास आहे की ही पेस्ट चेहऱ्याचा कोरडेपणा कमी करते. आणि त्वचेचा ओलावा टिकवून ठेवते. अनेक ब्यूटी प्रोडक्टस हेव्ह पदार्थ वापरतात. परंतु आपण असे लेप घरच्या घरी बनवू शकतो ते ही केमिकल विरहित.