करिअरच्या सुरुवातीला सुमार वाटणारी ही अभिनेत्री आज आहे ब्युटी क्वीन.. सलमानचा घेतला होता-

बॉलिवूड ब्युटी कियारा अडवाणीने इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. आज तिचा स्वत: एका मोठा चाहतवर्ग आहे. भलेही तिने साऊथ सिनेमातून सुरूवात केली असेल, पण तिला बॉलिडूनेच जास्त ओळख दिली.

‘कबीर सिंह’ सारखा सुपरहिट सिनेमा तिच्या नावावर आहे.अलीकडेच ती एका मॅगझिनच्या कव्हर पेजवर आली आहे ज्यात तिने केलेले फोटोशूट व्हायरल होत आहे. कियाराने या फोटोशूटद्वारे मॅगझिनला  एक मुलाखतही दिली, ज्यामध्ये तिने बर्‍याच गोष्टींचा खुलासा केला.  

कियाराला विचारण्यात आले  आतापर्यंतचा उत्तम सल्ला कोणाकडून आणि काय मिळालंय तुला. यावर ती म्हणाली, मला सलमान सरांनाकडून उत्तम सल्ला मिळाला आहे. ते मला म्हणाले, कठोर परिश्रम करा आणि तुझं काम बोलू दे.

कियारा आडवाणीचे खरे नाव कियारा नसून आलिया असल्याचे खूपच कमी जणांना माहीत आहे. तिने तिचे हे नाव इंडस्ट्रीत येण्यासाठी बदलले. सलमान खानने तिला हे नाव बदलण्याचा सल्ला दिला होता.  

सलमानचे म्हणणे होते की, एकाच नावाच्या दोन अभिनेत्री बॉलिवूडमध्ये असू शकत नाहीत. त्याने मला नाव बदलायला सुचवले असले तरी नवीन नाव काय ठेवायचे हे मी ठरवले. कियारा हे नाव मला आवडत असल्याने मी कियारा या नावाने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.   

आपल्या पहिल्या रिलेशनशिपबद्दल बोलताना कियारा म्हणाली आहे की, ‘जेव्हा मी पहिल्यांदा रिलेशनशिपमध्ये आले तेव्हा मी दहावीत होतो. मग आईने मला फोनवर बोलताना पकडले. मग तिने मला समजावले की, तुझ्या बोर्डाच्या परीक्षा येत आहेत, सध्या तुझे सर्व लक्ष अभ्यासावर असायला हवे.

यापुढे कियारा ने असेही नमूद केले की तिचे कुटुंब हाच तिचा सर्वात मोठा पाठिंबा आहे. तिच्या आईने तिला कायमच पाठिंबा दिला आहे आणि त्यामुळेच ती आज इथपर्यंत पोहोचू शकली आहे.

वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर कियारा शेवटची इंदू की जवानीमध्ये दिसली होती. ती शेरशाहमध्ये सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसणार आहे. याशिवाय कियारा सध्या जुग जुग जियोचे शूटिंग करते आहे. यात ती वरूण धवनसोबत दिसणार आहे. 

.