KGF मधील ‘रॉकी’ ची चित्रपटातील आई खऱ्या आयुष्यात आहे खूपच हॉट, फोटो पाहून पडाल प्रेमात

साऊथचा सुपरस्टार यशचा KGF चित्रपट बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई करत आहे. देश-विदेशात या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्याच्या स्टारकास्टची जोरदार चर्चा आहे. यशबद्दल तुम्हाला माहिती असलेच . पण तुम्हाला त्याच्या ऑनस्क्रीन आईबद्दल माहिती आहे का?

KGF 2 मध्ये कन्नड अभिनेत्री अर्चना जोइस हिने रॉकी भाईच्या आईची भूमिका साकारली आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की पडद्यावर आईची भूमिका अत्यंत गांभीर्याने साकारणारी अर्चना जोईस केवळ 27 वर्षांची आहे. अर्चना खऱ्या आयुष्यात खूपच सुंदर आहे.

तिच्या इन्स्टा अकाऊंटवर नजर टाकली तर ते ग्लॅमरस फोटोनी भरलेले आहे. अर्चना ही साउथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेत्री आहे. KGF 2 अर्चनाच्या करिअरसाठी सर्वात मोठा गेम चेंजर ठरला आहे. या चित्रपटाने तिला प्रसिद्धी मिळवून दिली.

बेंगळुरूमध्ये जन्मलेल्या अर्चनाला कॉलेजमध्ये असताना अभिनयात रूची निर्माण झाली आणि शिक्षण पुर्ण करून तिने अभिनयात पदार्पण केलं. अर्चना एक चांगली तर अभिनेत्री आहे त्यासोबत ती एक उत्तम डान्सर देखील आहे. अर्चना जोईस ही एक ट्रेंड कथक नृत्यांगना आहे.

चित्रपटांत, टीव्हीवर छोटे छोटे रोल करून स्वबळावर तिनं स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. करिअरच्या सुरूवातीला दर्गा व महादेवी या मालिकेत तिला संधी मिळाली. अर्चना विवाहित असून तिच्या पतीचे नाव श्रेयस उथुप्पा आहे. अर्चना पतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.