दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने केली अशी काही पोस्ट…

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई झाली आहे. रविवारी वांद्रे येथील ब्रीज कॅण्डी रुग्णालयात करीनाला दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सैफ अली खानने मुलगा झाल्याची गोड बातमी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आज करीनाला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

दुसऱ्या बाळाला जन्म दिल्यानंतर करीनाने सोशल मीडियावर पहिल्यांदा पोस्ट शेअर केली आहे. करीनाची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.करीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केला आहे. यात हॉरर-कॉमेडी ‘भूत पोलिस’ या चित्रपटाचे पोस्टर आहे.

अभिनेता सैफ अली खान, अर्जुन कपूर, अभिनेत्री यामी गौतम आणि जॅकलिन फर्नांडिस या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पोस्टरमध्ये सगळे कलाकार उभे असून कॅमेराकडे त्यांची पाठ आहे. त्या चौघांच्या हातात शस्त्र दिसत आहे.

थोड्या अंतरावर हॉन्टेड हाऊस दिसत आहे. “किंचाळण्यासाठी आणि हसण्यासाठी तयार रहा” अशा आशयाचे कॅप्शन करीनाने तो पोस्टर शेअर करत दिले आहे.’भूत पोलिस’ हा चित्रपट १० सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबई, हिमाचलमधील धर्मशाळा, जैसलमेरसारख्या अनेक ठिकाणी झाले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.

दरम्यान, करीनाला आज ब्रीज कॅण्डी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. करीना सैफ, तैमूर आणि तिच्या बाळासोबत घरी जातानाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.