आपल्या नवऱ्यांना सोडून या 2 सुप्रसिद्ध अभिनेत्र्या करतायत हिमाचल मध्ये तिसऱ्या सोबतच मजा.. फोटोज झाले व्हायरल

आपल्याला माहीतच आहे की कोरोना काळात प्रसार रोखण्यासाठी साठी भारतात अभूतपूर्व लॉकडाऊन घोषित करण्यात आला. याचा मोठा फटका बॉलीवूड क्षेत्राला देखील बसला होता कारण सर्वच चित्रपटांचे चित्रीकरण थांबले होत. आणि थिएटर्स बंद असल्यामुले चित्रपट रिलीज देखील झाले नाहीत. त्यामुळे हा काळ सर्वच कलाकारांनी घरी बसूनच व्यतीत केला.

आता सध्या भारत अनलॉक फेज मध्ये आहे. चित्रपटांचे चित्रीकरण योग्य ती काळजी घेऊन पुन्हा सुरू करण्यात आली आहे. तसेच पर्यटनासाठी देखील परवानगी देण्यात आली आहे. याच संधीचा फायदा उचलत अनेक बॉलिवूड स्टार भ्रमंती करताना दिसत आहेत.

असंच एक जोडपं हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा या थंड हवेच्या ठिकाणी एंजॉय करताना दिसलं आहे. परंतु हे जोडपं नवरा बायको नसून या फक्त मैत्रिणी आहेत. होय, तुम्हाला विश्वास नाही बसणार परंतु अश्याच एका जोडप्याचे फोटोज सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत. चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ते.

बॉलीवूड अभिनेत्र्या करीना कपूर आणि मलायका अरोरा खान या सर्वांनाच परिचित आहेत. या दोघीही खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. आणि त्यांच्या मैत्रीचे किस्से संपूर्ण बॉलिवूड मध्ये प्रसिद्ध आहेत. नुकत्याच या दोघी हिमाचल प्रदेशात रवाना झाले होत्या. या दोघींनी या वर्षीची दिवाळी हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साजरा करण्याचा निर्णय घेतला होता.

खरंतर करिनाचा पती सैफ अली खान आणि मलायकाचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूर देखील तेथेच आहेत. परंतु ते सध्या चित्रपटाच्या शुटिंग मध्ये व्यस्त आहेत. याच संधीचा फायदा उचलत करीना आणि मलायकाने फायदा उचलत ही ट्रिप प्लॅन केली. आणि आता दोघी हिमाचल च्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.

करिना जेव्हा धर्मशाळा च्या दिशेने निघाली होती तेव्हाच ती मुंबई विमानतळावर दिसली होती. ती म्हणाली, ‘सैफ सध्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी धर्मशाळा येथे आहेत. आणि मी व तैमुर देखील तेथे कधी गेलो नाही आहोत. म्हणून आम्ही तिकडे जाण्याच्या निर्णय घेतला आहे. खुल्या हवेत तसेच हिमाचल मधील पर्वत रांगांमध्ये वेळ घालवण्यात काही औरच मजा आहे’

सैफ आणि अर्जुन सध्या त्यांच्या पुढच्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी धर्मशाळेत आहेत. ‘भूत पोलिस’ नावाचा हा हॉरर-कॉमेडी चित्रपट पवन कृपलानी यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज आणि यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत आहेत. दिवाळीच्या रात्री जॅकलिन आणि यामी दोघींनीही या 2 जोडप्यांसह उत्सव साजरा केला.

दरम्यान, या दोघी मैत्रिणी शहराच्या रस्त्यावर फिरत धर्मशाला येथे त्यांच्या वेळेचा पुरेपूर फायदा घेत असल्याचे दिसत आहे. त्यांच्या सोबत आणखी एक तिसरा पाहुणा आहे. तो म्हणजे दुसरा कोणी नसून सर्वांचा लाडका स्टार कीड सैफ अली खान आणि करीना कपूर यांचा मुलगा तैमुर आहे. तैमुर देखील तेथे खूप मजा मस्ती करताना दिसत आहे

असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सैफ आणि करिनाचा मुलगा तैमूर ला पाहण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती. जमलेली सर्व लोक त्याचा फोटो काढू इच्छित होते. परंतु त्याने ‘माझा फोटो नका काढू’ म्हणत सर्वाना सक्त टाकीद दिली. हा व्हिडिओ करीना द्वारे इन्स्टाग्रामवर टाकण्यात आला होता