बॉलीवूडच्या ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला एक चाहता म्हणाला ‘आंटी’.. त्यावर रागाच्या भरात तिने दिले असे उत्तर..

सध्याच्या काळात सोशल मीडिया हा प्रत्येकाच्याच आयुष्याचा एक अविभाज्य घटक बनला आहे. तरुण-तरुणी असोत किंवा वृद्ध, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या प्रकारे सोशल मीडियावर व्यक्त होतच असतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना आपल्या आयुष्यातील गोष्टी इतरांशी शेअर करणे आवडते.

परंतु बर्‍याच वेळा काही लोक या सोशल मीडियाचा चुकीचा फायदा घेतात आणि त्यामूळे अनेक हास्यास्पद घटना घडतात. बॉलिवूडचे अनेक स्टार्सही सध्या सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत. हे लोक त्यांचे फोटो चाहत्यांसहही शेअर करतात. सोशल मीडियावरील त्यांचे फॉलोअर्स या फोटोजना भरभरून प्रतिसाद देतात. त्यावर मिळणाऱ्या लाईक, शेअर्स आणि कमेंटस वरून बॉलिवूड स्टार्सना आपल्या कामाची पोचपावती मिळत असते.

पण सोशल मीडियावर असेही काही लोक आहेत जे या स्टार्सना ट्रोल देखील करत असतात. बर्‍याच वेळा ते त्यांच्याबद्दल हास्यास्पद गोष्टी बोलतात की वाचणार्यालासुद्धा लाज वाटेल. अशा टिप्पण्यांवर या तार्‍यांची प्रतिक्रिया काय असेल याचा तुम्हाला कधी विचार आला आहे? हे सांगण्यासाठी, सलमान खानचा भाऊ अरबाज खान एक नवीन वेब शो घेऊन आला होता.

वास्तविक अरबाज ‘पिंच’ नावाचा वेब टॉक शो होस्ट करीत आहे. या शोमध्ये तो बॉलिवूड स्टार्सशी संवाद साधताना दिसणार आहे सोबतच सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आलेल्या वाईट टिप्पण्या वाचून वदाखवणार आहे. यानंतर, यावरील या तार्‍यांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेण्याचा अरबाज प्रयत्न करेल. या शोमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी, सनी लिओनी, करीना कपूर, सोनाक्षी सिन्हा, कपिल शर्मा, करण जोहर आणि सोनम कपूर असे अनेक स्टार दिसणार आहेत.

अरबाजच्या या शोमध्ये करीना कपूर देखील दिसली होती. शोमध्ये अरबाजने एका व्यक्तीची करीनावरील टिप्पणी वाचून दाखवली ज्यात असे लिहिले होते की – “आता तू आंटी झाली आहेस, त्यामुळे तू आंटी सारखीच वागत जा आणि किशोरवयीन मुलीसारखे वागू नकोस.” सोबतच तिला तिच्या वयानुसार योग्य कपडे घालण्याचा सल्ला देखील एकाने दिला.

लोकांच्या या टिप्पणीवर करिनाने आपला प्रतिसाद देत म्हटले आहे की, “बॉलिवूड स्टार्सविषयी काही लोकांचे वागणे अतिशय निंदनीय आहे. त्यांना असे वाटते की आम्हाला भावनाच नाही आहेत. आम्हाला नाईलाजाने ह्या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागतात. परंतू अश्या काही टिप्पण्या जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा खूप वाईट वाटतं”

2016 सालीसुद्धा करीनाने सोशल मीडियावर मिळालेल्या अशा कमेंटवर आपली प्रतिक्रिया दिली. तेव्हा करिनाने म्हटले होते की पूर्वी लोकांच्या मनातील चित्रपटातील कलाकारांबद्दल प्रचंड आदर होता.पण हे आजच्या काळात दिसत नाहीये. पूर्वी लोक फिल्मी स्टार्सची एक झलक बघायलाही दिवाने असायचे, पण आता हेच चाहते काहीही उलटसुलट बोलायला मागेपुढे पाहत नाहीत.

करीना कपूर अधिकृतपणे इन्स्टाग्रामवर नाही आहे परंतु तरीही तेथील सर्व गोष्टींची खबर ठेवते. कॉफी विथ करण शोमध्ये असेही समोर आले होते की करीना सोशल मीडियावर फेक आयडी बनवून अ‍ॅक्टिव्ह राहते आणि सर्व स्टार्सचे अपडेट्स मिळवत राहते. करीना नुकतीच अक्षय कुमारसोबत ‘गुड न्यूज’ चित्रपटात दिसली होती.