कट ड्रेस घालणं करिनाला पडलं महागात; झाली बेक्कार फजिती

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान अलीकडेच पती सैफ अली खान आणि मोठा मुलगा तैमूर अली खानसोबत मुंबईत स्पॉट झाली.

यादरम्यान सैफ आणि करीना त्यांच्या मुलासोबत लंच डेटसाठी फूड हॉलमध्ये पोहोचले होते जिथे पापाराझींनी या कपलला स्पॉट केलं. यादरम्यान या स्टार कपलचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले आहेत. जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

सैफ-करीनाचा व्हिडिओ व्हायरल

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्स सैफ आणि करिनाच्या लुकचं कौतुक करत आहेत. यादरम्यान, जिथे सैफ अली खान कुर्ता पायजमा घालून नवाबी स्टाईलमध्ये दिसला, तर सनग्लासेने सैफच्या लूकमध्ये आणखीनच भर घातली होती.

करीना कपूर खानच्या लूकबद्दल सांगायचं झालं तर, बेबो गुलाबी रंगाच्या समर लूकमध्ये अतिशय साध्या आणि स्टायलिश स्टाईलमध्ये दिसली. मात्र, यादरम्यान तिच्या ड्रेसचा कट तिला थोडा त्रास देत असल्याचं दिसून आलं. यावेळी करीना कपूर गुलाबी कॉटन मॅक्सी ड्रेसमध्ये दिसली.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, करीनाच्या ड्रेसला थाई स्लिट कट होता. यासोबतच बलून स्लीव्हज तिच्या या समर लूकला परफेक्ट टच देत होते. बेबोने स्नीकर्स आणि सनग्लासेससह तिचा लूक पुर्ण केला. या ड्रेसमध्ये अभिनेत्रीला चालताना अडचण होत होती. त्यामुळे अभिनेत्री या व्हिडिओमध्ये Oops Momment ची शिकार झाल्याचं दिसत आहे.