करण जोहरने आता हद्दच केली, शाहरुखला त्याच्या पोरीबाबत विचारला इतका ‘घाण’ प्रश्न, तिच्या बॉ..

शाहरुख खान नेहमीच त्याच्या कामासोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. शाहरुख नेहमीच आपल्या कुटुंबाला प्राधान्य देतो. अनेकदा तो कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतो. शाहरुख एक परिवाराचा रक्षक पती तसेच प्रोटेक्टिव्ह असा बाप आहे. एका चॅट शोदरम्यान त्यानेच याबाबत खुलासा केला.

खरंतर, एकदा अभिनेता शाहरुख खान प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचला होता. यावेळी त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्टही उपस्थित होती. दोन्ही कलाकार त्यांच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते. यादरम्यान दोघांनी करणसोबत अनेक गोष्टींवर चर्चा केली.

करणने शाहरुखच्या मुलीबद्दल विचारला प्रश्न…

संभाषणाच्या संदर्भात करण जोहरने शाहरुख खानला त्याच्या मुलीशी संबंधित असा प्रश्न विचारला, ज्याला शाहरुखने रागात उत्तर दिले. शाहरुख खानने सर्वांसमोर धमकी दिली होती की, जर कोणत्याही मुलाने सुहाना खानला किस करण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचे बरे वाईट करेल. त्याचे उत्तर ऐकून करण आणि आलिया दोघेही थक्क झाले.

‘कॉफी विथ करण’ या चॅट शोमध्ये करणने शाहरुखला विचारले की, ‘तुझी मुलगी 16 वर्षांची झाली आहे, ज्याने तुझ्या मुलीला किस केले त्याला तू मारशील का?’ याला उत्तर देताना शाहरुख लगेच म्हणाला की- ‘मी त्याचे ओठ काढून बाहेर फेकून देईन.’ शाहरुखच्या या उत्तरावर आधी करण आणि आलिया आश्चर्यचकित झाले. मात्र, दुसऱ्याच क्षणी सर्वांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

पुढे करण जोहरने सांगितले की, शाहरुख एक वडील म्हणून किती संरक्षक आहे. करण पुढे म्हणतो की, ‘मलाही असेच वाटते, तुझी मुलगी 16 वर्षांची आहे आणि मला माहित आहे की तू तिच्यावर लक्ष ठेवून आहेस आणि तिला हे अजिबात आवडत नाही.’ हे ऐकून आलिया म्हणते की, ‘मला असे वाटते. शाहरुखचे मुलांशी मैत्रीचे नाते आहे, मी त्याला सेटवर मुलांसोबत पाहिले आहे.

पुढे, शाहरुखने आलिया भट्टचा मुद्दा नाकारला. तो म्हणतो की ‘मला फक्त माहिती ठेवायची आहे’. यावर करण पुढे म्हणतो की, ‘शाहरुख आपल्या कुटुंबाबद्दल ‘भय’ असलेल्या पात्राप्रमाणे वागतो. मग ती त्याची पत्नी, मुलगी किंवा मुलगा असो.