कपिल शर्मा ला विदेशात मुलीने मारली ‘कानफटात’, फ्लर्ट करणे पडले कपिलला चांगलेच महागात, पहा Video

कॉमेडीचा किंग म्हटला जाणारा कपिल शर्मा अनेकदा चर्चेत असतो. कपिल शर्मा कॉमेडी करण्याची एकही संधी सोडत नाही. तो अनेकदा त्याच्या चाहत्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न करतो. कपिल अनेकदा सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि त्याचे फोटो शेअर करत असतो.

दरम्यान, कपिल शर्माने इंस्टाग्रामवर एक अतिशय मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये कपिल एका सुंदर मुलीसोबत फ्लर्ट करताना दिसत आहे, पण तेवढ्यात सुमोना चक्रवर्ती येते आणि मग असे काही घडते की ती मुलगी कपिल शर्माला कानफटात मारते.

कपिलने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक सुंदर मुलगी कपिलसोबत बोलताना दिसत आहे. तोच कपिल त्या मुलीसोबत फ्लर्ट करायला लागतो. कपिलही त्या मुलीशी खोटं बोलतो. पण कपिलला हे खोटं बोलणे महागात पडते.

कपिल मुलीला सांगतो की बुर्ज खलिफा बिल्डिंग त्याची आहे, त्यानंतर तो शेजारी उभ्या असलेल्या फरारी कार लाही त्याची स्वतःची असल्याचे सांगतो. कपिलने या सर्व गोष्टी मजेशीरपणे सांगितल्या होत्या. ते ऐकून आपल्याला बघून हसू येते. जेव्हा कपिल त्या मुलीला कारमध्ये बसवतो तेव्हा कपिलच्या शोमध्ये त्याच्या पत्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री सुमोना येते आणि कपिलचे सर्व पोलखोल करते.

सुमोना म्हणते की तो विवाहित आहे. तसेच ही कारही त्याची नाही. हे सर्व जाणून मुलीला राग येतो आणि ती कपिलला कानफटात मारून निघून जाते. हा व्हिडिओ शेअर करत कपिल शर्माने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘जेव्हा तुम्ही दुबईमध्ये फसवणूक करता.’ कॅप्शनसोबतच त्याने तीन मजेदार इमोजी वापरल्या आहेत.

हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. काही सेलिब्रिटींनीही व्हिडिओवर कमेंट करत हसणाऱ्या इमोजीसह कपिलचे कौतुक केले आहे.