बोल्ड सीन शूट करतांना जॉन अब्राहम ने जोश जोश मध्ये अभिनेत्रीच्या अवयवातुन काढलं होत रक्त…

मॉडेलिंग आणि मीडिया फर्ममध्ये काम केल्यानंतर अभिनेता जॉन अब्राहमनं म्युझिक व्हिडीओ आणि त्यामागोमागच चित्रपटांमध्ये काम करत त्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. जॉनचे चित्रपट एकतर त्याच्या पिळदार शरीरयष्टीमुळे आणि त्याच्या इंटिमेट सीनमुळे कमाल गाजले. (kangana ranaut shoot out at wadala bold scene)

shoot out at wadala या चित्रपटामध्ये त्यानं साकारलेली ‘मन्या सुर्वे’ ही भूमिका तुफान गाजली. या चित्रपटातून त्यानं अभिनेत्री कंगना राणौतसोबत स्क्रीन शेअर केली. (kangana ranaut john abraham)

जॉन आणि कंगनाची केमिस्ट्री चर्चेत आली ती म्हणजे या चित्रपटातील त्यांच्या इंटिमेट सीनमुळे. तो सहसा कोणतंही पात्र साकारताना सहसा त्या पात्राशी एकरुप होऊन जातो.

shoot out at wadala मधील लव्ह मेकिंग सीनच्यावेळीसुद्धा असंच झालं. दृश्याच्या वेळी दोघांच्या नात्यामधील प्रेम आणि राग हे दोन्ही भाव एकाच वेळी त्यांनी दाखवणं अपेक्षित होतं. पण, हे करण्याच्या नादात जॉनकडून कंगनाला दुखापत झाली.

shoot out at wadala मधील एका गाण्यामध्ये जॉन आणि कंगनाचे दोन पॅशनेट लव्ह मेकिंग सीन होते. ज्यामध्ये एका दृश्यात त्यांची पॅशनेट Kiss होती आणि दुसऱ्या दृश्याच्या वेळी Voilent love making दाखवणं अपेक्षित होतं.

किसिंगच्या सीनला ओके टेक मिळालं. पण, पुढे लव्ह मेकिंग सीनच्या वेळी जॉन कंगनाचे हात पकडतो तेव्हाच तिच्या हातातील बांगड्या तुटतात असं दाखवायचं होतं. तेव्हाच जॉन पात्राशी इतका एकरुप झाला की, हातातील बांगडी फुटली आणि तिच्या हातात रुतली.

बांगडी हातात रुतल्यामुळे लगेचच तिच्या हातून रक्त वाहू लागलं. आपल्याकडून झालेली ही चूक लक्षात येताच जॉननं कंगनाची माफी मागितली. तिथं असणाऱ्या प्रत्येकानंच ही बाब समजून घेतली की, दोन्ही कलाकारांनी पात्राला न्याय देण्यासाठी म्हणून हा अभिनय केला होता.