धक्कादायक, अखेर जया बच्चनने सोडले मौन, अमिताभ व ऐश्वर्या घरात कसे राहतात

अमिताभ बच्चन यांना महान नायक म्हटले जाते. अमिताभ हे त्यांच्या सुपरहिट चित्रपटांमुळे बॉलिवूडचे बादशहा म्हणून ओळखले जातात. 80 च्या दशकातील असो वा आजचे अमिताभ हे सर्व प्रकारच्या भूमिकांमध्ये परफेक्ट राहिलेले आहेत. नुकताच अमिताभ बच्चन यांचा झुंड चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ते फुटबॉल खेळाचे प्रशिक्षक म्हणून दिसले होते.

चित्रपटाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केले होते. या चित्रपटात अमिताभ यांची भूमिका खरोखरच पाहण्यासारखी होती. मात्र, आज आपण अमिताभ बच्चन यांच्याबद्दल नाही तर त्यांची बायको म्हणजेच जया बच्चन यांच्याबद्दल बोलणार आहोत. अलीकडेच जयाने तिच्या कुटुंबाशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत.

जया बच्चन या केवळ एक उत्तम अभिनेत्री नसून एक उत्तम राजकारणी देखील आहेत. जया बच्चन या पहिल्या अभिनेत्री आहेत ज्यांना राजकारणासोबतच चित्रपटांमध्येही भरपूर यश मिळाले आहे. जया लाइमलाइटपासून दूर राहणे पसंत करतात, परंतु जेव्हा त्या काही बोलतात तेव्हा बऱ्यापैकी न्युज पोर्टल त्यांना कव्हर करतात.

नुकतेच एका मीडिया मुलाखतीदरम्यान जया यांनी अमिताभ बच्चन आणि त्यांची सून ऐश्वर्या राय यांच्याबद्दल अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, की ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. जया बच्चन यांनी घरातील सर्व सदस्यांचे गुपित उघडे केले आहेत.

आतापर्यंत तुम्ही बॉलिवूडचा बादशाह आणि ऐश्वर्या राय बच्चन यांना सासरे आणि सून म्हणून पाहिले असेल. पण जया बच्चन यांच्या म्हणण्यानुसार, या दोघा सून-सासऱ्यांचे काही रहस्य आहेत, ते जाणून घेतल्यावर तुमच्या पाया खालची जमिनच सरकेलं. आयडिया एक्सचेंजच्या विशेष कार्यक्रमात राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी त्यांच्या घराशी संबंधित अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख केला.

जया आणि अमिताभ बच्चन यांची प्रेमकहाणी एकेकाळी खूप गाजली होती. अमिताभ बच्चन यांच्या खूप जवळ असूनही जयाला अमिताभसोबत काम करायला आवडत नाही. जाणून घेऊया काय आहेत जया बच्चन, अमिताभ आणि ऐश्वर्या राय यांचे काय काय रहस्य आहेत. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन या दोघांनाही एकत्र टीव्ही पाहणे आवडत नाही.

आज प्रत्येक घराघरात टीव्ही आहेत. टीव्ही हे आपल्या घरातील मनोरंजनाचे एकमेव साधन बनले आहे असेच समजा. अशा परिस्थितीत प्रत्येकाला कुटुंबासोबत बसून टीव्ही पाहणे आवडते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जया बच्चन यांना त्यांच्या पतीसोबत म्हणजेच अमिताभ बच्चनसोबत टीव्ही पाहणे आवडत नाही. अमिताभ आणि अभिषेक दोघेही दुसऱ्या खोलीत जाऊन टीव्ही बघतात. हे आम्ही म्हणत नाही तर खुद्द जया बच्चन या म्हणत आहेत.

जयाच्या म्हणण्यानुसार, अमिताभ यांना फक्त स्पोर्ट्स चॅनल बघायला आवडते, तर जया यांना हे चॅनल खूपच कंटाळवाणे वाटते. जया म्हणाल्या की, अभिषेक आणि अमिताभ दोघे एकत्र स्पोर्ट्स चॅनल पाहतात, त्यामुळे ते दुसऱ्या खोलीत जाऊन टीव्ही पाहतात. जया बच्चन सांगतात की, माझी सून ऐश्वर्या घरातील सर्व कामे स्वतः करते, ती घरातील सर्व सदस्यांची काळजी घेते.

जयाने तिची सून ऐश्वर्या रायबद्दल सांगितले की, जयाच्या मते, ऐश्वर्या राय केवळ एक चांगली सूनच नाही तर एक चांगली आणि काळजी घेणारी आई देखील आहे.ती आराध्याला कधीही एकटी सोडत नाही आणि घरातील सर्व कामे स्वतः करते. जयाच्या म्हणण्यानुसार, ऐश्वर्या स्वतः आराध्याला तयार करते, खाऊ घालते, आंघोळ घालते आणि तिला शिक्षण शिकवते. जयाच्या म्हणण्यानुसार, ऐश्वर्या सर्वांचीच जास्त काळजी घेते.