अभिनेत्री जान्हवी कपूर ने ‘धडक’ सिनेमातून पदार्पण केले. आतापर्यंत तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. जाह्नवी सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते.आपल्या ग्लॅमरस फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
जान्हवी अलीकडेच एका चॅट शोमध्ये आली होती, यादरम्यान तिची बहीण खुशी कपूर देखील तिच्यासोबत होती. या चॅट शोमध्ये जान्हवीने बर्याच प्रश्नांची स्पष्ट उत्तरे दिली. अनेक खळबळजनक खुलासे तिने या मुलाखती मध्ये केले आहेत.
या शो दरम्यान तिला कोणत्या अभिनेत्याला किस करायचे आहे असा प्रश्न विचारण्यात आला. कार्तिक आर्यन आणि ईशान खट्टरचे नाव न घेता अभिनेत्रीने थेट विक्की कौशलचे नाव घेतले. हे नाव घेतल्यावर अनेकांचे डोळे विस्फारले.
तिने सांगितले की, तिला हँडसम हंक विक्की कौशलसोबत किसिंग सीन करण्याची इच्छा आहे. तिला त्याचा स्वभाव आणि बॉडी दोन्ही गोष्टी खूप आवडतात. दोघांनीही आतापर्यंत कोणताही चित्रपट केलेला नाही, दोघांनी जाहिरातीमध्ये मात्र एकत्र काम केले आहे.
या शोमध्ये तिला ईशान खट्टरसोबत असलेल्या कथित प्रकरणांशी संबंधित प्रश्न देखील विचारण्यात आला. जाह्नवी म्हणाली की, ईशानशी तिचा खरोखर काही संबंध नाही. मुलाखतीदरम्यान खुशीने असेही सांगितले की तिचे वडील बोनी कपूर स्वभाव शांत आहे आणि बॉयफ्रेंड असण्याचा अर्थ तिला चांगल्या प्रकारे समजतो.
न्हवी कपूरने धडक या चित्रपटाद्वारे तिने तिच्या करियरला सुरुवात केली. तिने नुकतेच ‘गुड लक जेरी’चे पहिले शेड्युल पूर्ण केले आहे. हा साऊथ स्टार नयनतारा अभिनित तमिळ चित्रपटाचा कोलामावू कोकिलाचा रिमेक आहे.
दोस्ताना २’मध्ये जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत आहे. स्वतःवरील आरोप खोडून काढण्यासाठी आता जान्हवीलाही डच्चू देणार असल्याचे समजते आहे.करण जोहरने जान्हवीच्या निवडीसाठी क्रिएटिव्ह टीम आणि दिग्दर्शकाशी खूप वाद घातला होता.
त्याने केलेल्या निवडीमध्ये अक्षय कुमार, राजकुमार राव, वरुण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि सिद्धांत चतुर्वेदीचा समावेश आहे. आता नेपोटिझमचा मुद्दा कोणीही उपस्थित करू नये, यासाठी आता आपल्या या स्टारकास्टमध्ये कोणीही वशिलेबाजी केलेली असू नये, यासाठी जान्हवीला बाहेर काढण्याचा करणचा विचार आहे.

.