जान्हवी कपूर च्या आधी खुशी कपूरच लग्न ठरणार?, स्टारकिडच्या पोस्टने चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. जान्हवीप्रमाणेच तिची बहिण खुशी कपूरची (Khushi Kapoor) देखील चर्चा होत असते. त्यात आता खुशी कपूर संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. एका स्टारकिडसोबत ती रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. हा स्टारकिड कोण आहे? आणि हे प्रेम प्रकरण कसं सुरु झालं हे जाणून घेऊय़ात.  

प्रकरण काय?
खुशी कपूर (Khushi Kapoor) ही सोशल मीडियावर खुप अॅक्टीव्ह असते. तिचे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.त्यामुळे नेहमीच सोशल मीडियावर चर्चेच्या केंद्रस्थानी ती असते. त्यात आता एका स्टारकिडने सोशल मीडियावर तिच्यासोबतचा फोटो पोस्ट करत तिला आपली पत्नी म्हटले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर जान्हवी कपूर आधी खुशी कपूरचं लग्न ठरतेय की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. 

Unकोण आहे स्टारकिड? 
सोशल मीडियावर खुशी कपूरला (Khushi Kapoor) पत्नी म्हणणारी स्टारकिड आलिया कश्यप (Aaliyah Kashyap) आहे. आलिया कश्यप ही दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आहे. आलिया कश्यपने (Aaliyah Kashyap)  सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये आलियाने खुशी सोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. या पोस्टच्या कॅप्शनला तिने खुशी कपूरला स्वत:ची पत्नी म्हटले आहे. या पोस्टनंतर खुशी कपूरला (Khushi Kapoor) पत्नी म्हणणारा हा स्टारकिड कोण अशी चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे खुशी कपूरच्या लग्नाची देखील चर्चा सुरू झाली होती.