‘बाकी सगळे छोटे पण तुझी कंबर का इतकी मोठी आहे ?’ या प्रश्नावर भडकली होती ही सुप्रसिद्ध अभिनेत्री..

बॉडी शेमिंग करणे अर्थात एखाद्याच्या शरीराची खिल्ली उडवणे यामुळे खिल्ली उडवणाऱ्याला जरी असुरी आनंद मिळत असला तरी ज्या व्यक्तीची खिल्ली उडवली जाते त्यासाठी मात्र ही खूप मोठी गोष्ट असू शकते. यामुळे त्या व्यक्तीच्या मनावर मोठा परिणाम होऊ शकतो.

त्या व्यक्तीमध्ये स्वत:च्या शरीराबद्दल न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. अनेक प्रकरणात तर केवळ बॉडी शेमिंग मुळे पीडितांनी आत्महत्या केल्याची सुद्धा उदाहरणे आहेत. म्हणजेच बॉडी शेमिंग किती घातक गोष्ट असू शकते याची कल्पना आपण करू शकतो

बॉलीवूड आणि साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध अभिनेत्री इलियाना डीक्रुझ (ileana dcruz) ही सुद्धा आपल्या लहानपणी बॉडी शेमिंगच्या काळातून गेली आहे असे सांगितले तर तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण आताची इलियाना डीक्रुझ आणि तेव्हाची इलियाना डीक्रुझ यांमध्ये जमीन अस्मानाचे अंतर होते

बॉलीवूड बबलला दिलेल्या एका मुलाखती मध्ये इलियानाने सांगितले की, “मला आजही तो दिवस आठवतो जेव्हा माझ्या शरीराची पहिल्यांदा खिल्ली उडवली गेली होती.” तिने पुढे सांगितले की, “मी तेव्हा केवळ 12 वर्षांची होती आणि अनेकांनी माझ्या शरीरावर कमेंट करायला सुरुवात केली. “

”ते म्हणायचे तुझे बट्स एवढे मोठे कसे? तु अशी कशी दिसतेस? यांसारख्या प्रश्नांनी आणि चिडवण्याने मी खूप त्रस्त होती.” इलियानाने असेही सांगितले की, “जोवर अशा कोमेंट्स येत नव्हत्या तोवर मी माझे शरीर सुद्धा सामान्य आहे असेच समजायची, पण बॉडी शेमिंगमुळे मला माझ्याच शरीराची लाज वाटू लागली.”

इलियानाने सांगितले की, याचा तिच्या आयुष्यावर मोठा प्रभाव पडला आणि तिचे आयुष्यच निगेटिव्ह झाले. पण एक अशी वेळ आली जेव्हा तिला कळले की लोक म्हणतात म्हणून स्वत:ला त्रास करून घेण्यात अर्थ नाही. देवाने आपल्याला जसे ठेवले आहे तसेच राहावे.

आणि आहे तसेच स्वत:ला पसंत करावे हा विचार तिच्या मनात घट्ट रुजला. अशा काळात तिने स्वत:ला शक्य तितके सकारात्मक बनवण्याचे ठरवले आणि त्यावर काम केले. इलियानाच्या मते यासाठी स्वत:वर विश्वास आणि खूप हिम्मत असली पाहिजे. एकदा का ही हिम्मत आली की मग लोकं काय म्हणतात याचा फरक पडत नाही

केवळ इलियानाच नाही तर तिच्यासारख्या अनेक मुलींना आजही बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागते. त्यांचे शरीर आणि बॉडी कशी आहे यावरून अनेकांच्या कोमेंट्स ऐकाव्या लागतात. त्यांचा रंग, चेहरा, उंची, जाडपणा, बारीकपणा एवढेच काय तर केसांवरून सुद्धा खिल्ली उडवली जाते.

असे तेव्हा खास करून दिसते जेव्हा मुलीला पाहण्याचा कार्यक्रम असतो. अशा वेळी अप्रत्यक्षपणे घरच्यांसमोरच मुलीवर कोमेंट्स केल्या जातात. अशा केस मध्ये मुलीकडे एक वस्तू म्हणून पाहिले जाते, जे अत्यंत वाईट आहे

.