बायकोसोबत घटस्फोटानंतर आता हृतिक नव्या गर्लफ्रेंडसोबत दिसला अशा अवस्थेत.. व्हिडिओ व्हायरल..

अभिनेता हृतिक रोशन सध्या अभिनेत्री सबा आझादसोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी हृतिक आणि सबा एकत्र डिनरवर गेले होते. तेव्हापासून त्यांच्या मैत्रीबद्दल अटकळ बांधली जात होती. त्यानंतर सबा रोशन फॅमिलीसोबत लंच करताना दिसली आणि हा फोटोही खूप व्हायरल झाला.

आता हृतिक रोशन आणि सबा आझाद एअरपोर्टवर स्पॉट झाले आहेत. दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोघंही विमानतळावर एकमेकांचा हात धरताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपबाबत चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे.

हृतिक रोशनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो सध्या ‘विक्रम वेध’ सिनेमासाठी व्यस्त आहे. हा चित्रपट त्याच नावाच्या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सैफ अली खानही दिसणार आहे. त्याचबरोबर त्याच्याकडे आणखी एक फायटर सिनेमा आहे. ज्यामध्ये तो दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे.

अशा प्रकारे हृतिक रोशनच्या चाहत्यांना त्याची एक्शन स्टाईल पाहायला मिळणार आहे. 32 वर्षीय सबा आझादचा जन्म दिल्लीत झाला आणि ती ओडिसी, क्लासिकल, बॅले, जॅझ तसंच कंटेम्पररी डान्समध्ये ट्रेन आहे. सबा आझादने 2008 मध्ये ‘दिल कबड्डी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

या चित्रपटात ती राहुल बोससोबत दिसली होती. त्यानंतर ‘मुझसे फ्रेंडशिप करोगे’ हा तिचा चित्रपट आला होता. आता सबा आझादने ‘रॉकेट बॉईज’ या वेबसीरिजमध्ये परवीन इराणीची भूमिका साकारली आहे.