बेडरूममध्ये अभिनेता प्रेग्नेंट पत्नीसोबत जे वागला, तिला ते पटलच नाही

टेलिव्हिजन स्टार कपल गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी हे सध्या त्यांच्या पहिल्या मुलाच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. देबिना बॅनर्जी लवकरच बाळाला जन्म देणार आहे.

हे जोडपे प्रेग्नेंसीचा हा काळ एन्जॉय करत आहेत. गुरमीत आणि देबिना गरोदरपणातील मजेशीर आणि खास क्षण त्यांच्या चाहत्यांसोबत इंस्टाग्रामवर शेअर करत आहेत. नुकताच देबिनाने गुरमीतसोबतचा एक बेडरूमचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये गरोदर देबिना आराम करताना दिसत आहे, तर आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत असलेला गुरमीत आपल्या पत्नीच्या बेबी बंपवर हात फिरवताना दिसत आहे, कपलचा हा व्हिडिओ खूपच व्हायरल झाला आहे. काही वेळाने गुरमीतला वाटते की देबिना आरामात झोपली आहे, म्हणून तो त्याचा फोन हातात घेतो.

गुरमीतने फोन हातात घेताच देबिना एका सॉफ्ट टॉयच्या सहाय्याने तिला राग आल्याचं पतीला सांगताना दिसत आहे. हे पाहून गुरमीत पुन्हा पत्नीच्या बेबी बंपला मिठी मारतो. दोघांचा हा व्हिडिओ सगळ्यांचे लक्ष वेधत आहे.