तिने केली रितेश देशमुखची बोलती बंद, तिच्यापुढे रितेशने चक्क हात जोडले

बॉलिवूडमधलं क्यूट कपल म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया यांना चाहत्यांकडून कायम पसंती मिळत आलीय. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावर सतत सक्रिय असतात. रितेश आणि जेनलिया कधी त्यांचे मजा मस्तीचे तर कधी रोमॅण्टिक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत एकमेकांबद्दच्या भावना व्यक्त करताना दिसून येतात.

दोघांचेही व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना पाहायला मिळतं.नुकताच रितेश देशमुखने जेनेलियासोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. या मेजेशीर व्हिडीओला चाहत्यांकडून तुफान लाईकस् मिळतायत. या व्हिडीओत जेनेलियापुढे रितेशला हात जोडावे लागत असल्याचं दिसतंय.

व्हिडीओत जेनेलिया रितेशसमोर नॉनस्टॉप बडबड करताना दिसतेय. जेनेलियाची बडबड सुरु असताना रितेश जांभई देतो आणि जेनेलिया भडकते. “मी काही बोलत असतना तू जांभई काय देतोयस” असं म्हणत जेनेलिया रितेशवर रागवताना दिसतेय. खरं तर बिचारा रितेश जांभई देत नसून काही तरी बोलण्याचा प्रयत्न करतोय.

“मला काही बोलायचंय” असं रितेशनं बोलून देखील दाखवतो. मात्र जेनेलिया काही थांबेना. जेनेलियाची अंखड बडबड सुरुच राहिली. अखेर जेनेलियापुढे रितेशला हात जोडावे लागल्याचं व्हिडीओत दिसतंय.या धमाल व्हिडीओला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.

बायकोपुढे नवऱ्यांची बोलती बंद होते हे सांगण्याचा मजेशीर प्रयत्न रितेशने या व्हिडीओतून केलाय. ‘yawn संबध’ असं कॅप्शन देत रितेशने व्हिडीओ पोस्ट केलाय.रितेश जेनेलियाची ही क्यूट केमेस्ट्री पाहणं प्रेक्षकांनी कायम पसंत केलंय.

वेगवेगळ्या व्हिडीओच्या माध्यमातून रितेश जेनेलिया नात्यांमधील गमती-जमती सांगण्याच्या प्रयत्न करत असतात.