‘फुलाला सुगंध मातीचा’ मधील कीर्ती खऱ्या आयुष्यात आहे इतकी ग्लॅमरस.. हॉट डान्स व्हिडीओ झाला व्हायरल..

झी मराठी आणि मराठी माणूस यांच्यात एक अतूट नातं आहे. झी मराठी वर अश्या अनेक सीरिअल्स आल्या आहेत ज्या संपून एक मोठा काळ उलगडला तरीही अजूनही त्या प्रेक्षकांच्या आठवणीत आहेत. आधी तर मराठी वाहिनी म्हणजे झी मराठी असे काहीसे समीकरण होते जणू.

परंतु गेल्या काही वर्षांत झी मराठी ला टक्कर देत अजून काही वाहिन्या आल्या आहेत ज्या खूप लोकप्रिय झाल्या आहेत. कलर्स मराठी, स्टार प्रवाह, साम टीव्ही ही काही उदाहरणे. स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या अनेक मालिका भरपूर टीआरपी कमावत आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील काही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसून येत आहेत. यामध्ये फुलाला सुगंध मातीचा ही मालिकेने सुरुवातीपासूनच अनेकांची मने जिंकली. या मालिकेतील मुख्य पात्र शुभम कीर्ती यांच्यामुळेच मालिकेला जास्त प्रसिद्धी मिळाली.

फुलाला सुगंध मातीचा ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत असून या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. शुभम, किर्ती, जीजी अक्का ही पात्रं तर प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली आहेत. या मालिकेत किर्तीच्या भूमिकेत आपल्याला समृद्धी केळकरला पाहायला मिळत असून तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.

फुलाला सुगंध मातीचा मालिकेत शुभमचे पात्र हर्षद अतकरी व कीर्तीचे पात्र समृध्दी केळकर हे साकारत आहेत. आयपीएस होण्याचे स्वप्न बाळगणारी कीर्तीचे लग्न आचारी शुभम सोबत झाले. मनाच्या विरुद्ध लग्न झाले असले तरी दोघांचे प्रेम आता हळू हळू फुलताना दिसून येत आहे. सध्या मालिकेतील कीर्तीचे काही डान्स व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहेत.

समृद्धी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने शेअर केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ती आपल्याला रूपेरी वाळूत माडाच्या बनात ये ना या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. हा डान्स व्हिडीओ तुम्ही तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइल वर बघू शकता.

समृद्धीचा या गाण्यातील डान्स तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. पण त्याचसोबत या गाण्यातील तिच्या अदांची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. तसेच मालिकेत नेहमीच साडीत दिसणारी समृद्धी या व्हिडिओत एका वेगळ्याच रूपात दिसत आहे. तुझ्या डान्ससोबतच तुझे हे मॉर्डन रूप आम्हाला आवडले असे तिचे चाहते तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत आहेत.

समृद्धीची कलर्स मराठी वाहिनीवरील ‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ या मालिकेतील लक्ष्मीची भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. सध्या किर्ती ची भूमिका साकारणारी समृद्धी केळकर खऱ्या आयुष्यातही हरहुन्नरी आहे. अभिनयासोबतच समृद्धीला नृत्याचीदेखील फार आवड आहे. म्हणूनच समृद्धी लहानपणापासून कथ्थकचे शिक्षण घेत आहे.

ठाण्यामधील नुपूर नृत्यालयात तिने नृत्याचे धडे गिरवले. यावर्षी समृद्धी विशारद पूर्णच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली. सध्या समृद्धी शूटींगचं व्यग्र वेळापत्रक सांभाळून तिची ही आवड देखील उत्तमरीत्या जोपासत आहे असं म्हणायला हरकत नाही. कथ्थकबरोबरच समृद्धी लावणी, हिप हॉप, बॉलिवूड, वेस्टर्न याप्रकारचे नृत्य देखील लीना भोसले शेलार यांच्याकडून शिकत आहे.