या टॉपच्या बॉलिवुड चित्रपट कंपनीने केली नवरात्री संदर्भात अश्लील पोस्ट.. कंपनीवर बहिष्कार टाकण्याची लोकांकडून मागणी..

हिंदूं धर्मियांच्या भावनांसोबत खेळ करत नवरात्रीवर अश्लील पोस्ट टाकणे बॉलिवूडची टॉपची फिल्म बनवणारी कंपनी इरॉस नाऊ ला खूप भारी पडले आहे. या बहुचर्चित प्रकरणानंतर कंपनीवर बहिष्कार टाकण्याची मोहिम सोशल मीडियावर सुरु झाली. या पोस्ट मुळे पुन्हा एकदा ही बॉलिवूडची ही कंपनी वादाच्या भोवर्यात सापडण्याची शक्यता आहे

नुकतंच इरॉस नाऊ या चित्रपट बनवणाऱ्या कंपनीच्या ट्विटर हँडल वरून नवरात्री निमित्त एक पोस्ट टाकण्यात आली हाती. ही पोस्ट अत्यंत अश्लील होती. त्यामुळे लोकांकडून कंपनीला सतत लक्ष्य केले जात होते. त्यानंतर कंपनीने आता माफी मागितली आहे. परंतु माफी मागूनही नवरात्रीच्या अपमानाबद्दल लोकांचा रोष अद्याप कमी झालेला नाही.

इरोज नाऊ यांनी दिलगिरी व्यक्त केली की, ‘आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता. आम्ही ती पोस्ट हटवली आहे आणि त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत ‘.

वास्तविक पाहता कंपनीने नवरात्रीबद्दल असभ्य पोस्ट पोस्ट केली होती. ज्यात एका बाजूला कॅटरिन कैफ होती तर दुसरीकडे अभिनेता रणवीर सिंग. या पोस्टमध्ये वापरलेले शब्द अत्यंत आक्षेपार्ह होते, त्यामुळे लोक संतापले. #BoycottErosNow नेसोशल मीडियावर ट्रेंड करण्यास सुरुवात केली. नवरात्रीचा अपमान केल्याचा आरोप करून लोकांनी कंपनीला लक्ष्य केले. युजर्स कंपनीचे जुने ट्वीटसुद्धा शोधले जाऊ लागले, ज्यात त्याने ईदसारख्या सणांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकांच्या प्रचंड विरोधामुळे अखेर कंपनीला आता माफी मागावी लागली. इरोस नाऊने हे दर्शविण्याचा प्रयत्न केला की कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. जरी हे सत्य असले तरी, असा प्रश्न पडतो की त्याला उत्सवाबद्दल असे अश्लील पोस्ट तयार करण्याची आवश्यकता का वाटली? लोकप्रियता मिळवण्यासाठी हे सर्व केले गेले होते का?