लग्नाच्या अवघ्या पाच दिवसानंतर ही अभिनेत्री झाली प्रेग्नेंट? ‘त्या’ फोटोंमुळे होत आहे चर्चां !

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा नुकताच लग्नबंधनात अडकली. मात्र लग्नाच्या चक्क काही दिवसातच दिया प्रेग्नंट आहे की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे.लग्नानंतर पहिल्यांदाच दिया एअरपोर्टवर दिसून आली.

मात्र त्यावेळी दियाला बघून ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.दियाने काही दिवसांपूर्वीच आपला खास मित्र असणाऱ्या वैभव रेखीसोबत विवाह केला आहे. दियाच हे दुसरं लग्न आहे. तर दुसरीकडे वैभवच सुद्धा हे दुसरचं लग्न आहे.

वैभवने याआधी सुनैना हिच्याशी लग्न केलं होत. सुनैना ही एक योगा ट्रेनर आहे. या लग्नापासून या दोघांना एक मुलगी देखील आहे. वैभव हा उद्योजक आहे.गेल्या काही महिन्यांपासून दिया आणि वैभव हे नात्यात होते. अखेर त्यांनी 15 फेब्रुवारीला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा पार पडला.

39 वर्षाच्या दियाचा हा लग्नसोहळा फारच प्रसिद्धीत आला होता. दिया आणि वैभव सुद्धा आपल्या लग्नाचा पुरेपूर आनंद घेताना दिसून आले.अनेकांनी यावेळी वैभवची पहिली पत्नी सुनैनाचाही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला.

सुनैना ही योगा ट्रेनर असून तिने बॉलिवूडमधील अनेकांना ट्रेन केलं आहे.तर दिया ही बॉलिवूड मधील एक प्रसिद्ध अभिनेत्री असून तिने अनेक चित्रपटात काम केलं आहे. ’रेहना हे तेरे दिलमे’ या चित्रपटामुळे तर ती तरुण वर्गात खूपच फेमस झाली होती.दियाच्या लग्नाच्या अवघ्या काही दिवसानंतर उठणाऱ्या या चर्चांमुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.