ही प्रसिद्ध हॉट बॉलिवूड अभिनेत्री अडकणार दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत? कोण आहे तिचा होणारा नवरा

सध्या बॉलिवूडमध्ये लगीन घाई सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल लग्नाच्या बेडीत अडकले. त्यानंतर अभिनेत्री श्रद्धा कपूर, रणबीर-आलिया यांच्या लग्नाच्या चर्चा होताना दिसत आहेत. अशात आता बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा देखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

विशेष म्हणजे २०१९ मध्येच दियानं साहिल संघासोबतचं ११ वर्षांचं वैवाहिक जीवन संपवत घटस्फोट घेतला होता. सूत्राच्या माहितीनुसार दिया एका छोट्या समारंभात येत्या १५ फेब्रुवारीला बॉयफ्रेंड वैभव रेखीसोबत लग्न करणार आहे.

स्पॉटबॉय-ईच्या वृत्तानुसार दिया मिर्झा तिचा बॉयफ्रेंड वैभव रेखीशी लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. या लग्न सोहळ्याला फक्त दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळची मित्रमंडळी उपस्थित राहणार आहेत. मागच्या वर्षी दिया तिच्या रिलेशिपमुळे अनेकदा चर्चेत राहिली होती.

सूत्रांच्या माहितीनुसार लॉकडाऊनमध्येच वैभव आणि दिया यांच्यात जवळीक वाढली. वैभव मुंबईतील एक बिझनेसमन आणि इन्वेस्टर आहे. वैभवचा त्याची पत्नी म्हणजेच प्रसिद्ध योगा इन्स्ट्रक्टर सुनैना रेखीशी घटस्फोट झालेला आहे. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे.दरम्यान दिया मिर्झानंही २०१९ मध्ये घटस्फोट घेतला आहे.

दिया आणि साहिल यांनी लग्नाच्या ११ वर्षांनंतर परस्पर संमतीनं आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानी याची माहिती एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून दिली होती. या पोस्टमध्ये त्यांनी, ‘वेगळे झाल्यानंतर आम्ही एकमेकांचे चांगले मित्र राहू आणि एकमेकांच्या कठीण काळात नेहमीच एकमेकांची साथ देऊ.’ असं म्हटलं होतं.