‘देवमाणूस’ मालिका आता एका वेगळ्याच वळणावर, ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री घेतेय हॉट एंट्री..

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ सध्या प्रचंड गाजते आहे. ही मालिका आता एका विलक्षण वळणावर आली आहे. एखादी व्यक्ती आपल्याला देवासमान वाटतो पण त्याचा खरा चेहरा मात्र वेगळाच असतो.

चांगुलपणाचा बुरखा पांघरुन घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी ‘देवमाणूस’ ही मालिकेला सुरुवातीपासून रसिक खिळून आहेत. अल्पावधीतच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

सध्या मालिकेत रसिकांनी पाहिलं कि किती चतुराईने अजितकुमार त्याच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे ठरवतो. कोर्टात आर्या या निष्णात वकिलाविरुद्ध अजितकुमार आपली बाजू अत्यंत निर्भीडपणे मांडतो आणि ते सिध्द ही करतो.

आपण देवीसिंग नसून डॉक्टर अजितकुमार देव आहोत हे सगळ्यांना पटवून देतो. ठोस पुराव्यांअभावी कोर्ट देखील अजितकुमारची सुटका करणार अशातच एका नवीन व्यक्तिरेखेची मालिकेत एंट्री होणार आहे. चंदा ही व्यक्तिरेखा लवकरच मालिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

भूमिका अभिनेत्री माधुरी पवार निभावणार आहे. टीव्हीवर अजितकुमारची निर्दोष सुटका होणार का? ही बातमी पाहून चंदा गोंधळात पडते. या चंदाचा चेहरा पाहून कोर्टात अजितकुमारची शुद्ध हरपते. ही चंदा नक्की आहे तरी कोण? हिचा आणि देवीसिंगचा काय संबंध आहे? हे रसिकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

 भूमिकेविषयी बोलताना माधुरी म्हणाली, “देवमाणूस ही मालिका अत्यंत रंजक वळणावर आली असून अशा वेळी या लोकप्रिय मालिकेत माझी चंदा या व्यक्तिरेखेतून एंट्री होणार आहे म्हणून खूप जास्त उत्सुक आहे.

चंदा आणि देवीसिंग हे एकमेकांना ओळखतात पण ते एकमेकांना कसे ओळखतात आणि त्यांचा काय संबंध आहे हे प्रेक्षकांना लवकरच कळेल. चंदा ही एका वेगळ्या शैलीची व्यक्तिरेखा आहे. मी अशा प्रकारची भूमिका याआधी कधी केली नव्हती.

ही भूमिका निभावताना मला थोडंसं दडपण होतं पण संपूर्ण टीमने मला सांभाळून घेतलं. माझ्या आधी साकारलेल्या भूमिके इतकंच प्रेक्षक या भूमिकेवर देखील प्रेम करतील ही मला खात्री आहे.”

.