फोटोत दिसणाऱ्या या दोन मुली आहेत मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री

सोशल मीडियामुळे आपल्या लाडक्या कलाकाराची माहिती आणि त्यांचे कधीही न पाहिलेले फोटो तसंच व्हिडिओ पाहायला मिळतं. नुकतंच सोशल मीडियावर दोन लहान मुलींचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत दिसणाऱ्या लहान मुली दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे आहे.

गौतमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. गौतमी ही मृण्मयी देशपांडेची लहान बहीण आहे. फोटोत दोघीही शाळेच्या ड्रेसमध्ये दिसतायेत. फोटोला गौतमीने, ‘मी आणि ताई’ असे कॅप्शन दिले आहे. फोटोवर चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

मृण्मयीने कट्यार काळजात घुसली’, नटसम्राट, ‘स्लॅमबुक’ सिनेमात जबरदस्त परफॉर्मन्स दिला आहे. ‘अग्निहोत्र’, ‘कुंकू’ यासारख्या मालिकांमधून घराघरातील रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका या तिन्ही माध्यमांत उत्तम अभिनय आणि वैविध्यपूर्ण भूमिका साकारून आपला वेगळा ठसा उमटवला आहे.

तर गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. काही दिवसांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. दोनही बहीणी सोशल मीडियावर बऱ्याच अॅक्टिव्ह असतात.