मुलीला जन्म देऊन चार महिने नाही झाले, तोच ही अभिनेत्री पून्हा प्रेगंन्ट, नवरा दररोज रात्री…

टीव्हीचे लोकप्रिय जोडपे गुरमीत चौधरी आणि देबिना बॅनर्जी (Gurmeet Chaudhay and Debina Bonnerjee) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गुरमीत आणि देबिनाच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.

४ महिन्यापूर्वीच या कपलने एका मुलीला जन्म दिला असून आता ते दुसऱ्या मुलाच्या (Gurmeet and Debina Expecting Their 2nd Baby) स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. देबिना आणि गुरमीत यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी दिली आहे. या कपलने सोनोग्राफीचा रिपोर्ट शेअर करत ‘बेबी नं. २’च्या स्वागताची तयारी ते करत असल्याचे म्हटले.

या कपलने शेअर केलेल्या फोटोमध्ये देबिना, गुरमीत आणि त्यांची मुलगी लियाना दिसत आहे. देबिनाच्या हातात तिच्या दुसऱ्या गर्भधारणेचा सोनोग्राफी रिपोर्ट आहे. देबिनाने हा फोटो शेअर करताच त्यांच्यावर मित्र, सहकलाकार आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे. देबिना आणि गुरमीतच्या आयुष्यातील हा आनंद त्यांच्यासोबतच चाहतेही साजरा करताना दिसत आहेत.

दुसऱ्यांदा आई होणार देबिना

देबिना वयाच्या ३५ व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार आहे. या कपलने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिघांनीही पांढऱ्या रंगाचे आउटफिट कॅरी केले आहेत. टेलिव्हिजनवर ‘राम-सीता’ म्हणून लोकप्रिय असणाऱ्या या जोडीने फोटो शेअर करत असे म्हटले आहे की, ‘काही निर्णय योग्य वेळेवर अवलंबून असतात आणि त्यात काहीही बदल करता येत नाहीत. हा असाच एक आशीर्वाद आहे.आम्हाला परिपूर्ण करण्यासाठी लवकरच येत आहे….’ तिने हा फोटो शेअर करताना #babyno2 #mommieagain #ontheway #pregnancydiaries #daddyagain असे हॅशटॅगही वापरले आहेत.