‘निर्माते तर उगाचच बदनाम.. अभिनेत्र्याच येतात त्यांच्याकडे ‘तसल्या’ ऑफर्स घेऊन’.. अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा..

बॉलिवूड नावाने ओळखली जाणारी आपली भारतीय हिंदी फिल्म इंडस्ट्री सामान्य माणसाला कायमच हवीहवीशी वाटते. पण या इंडस्ट्री मध्ये अशा अनेक घटना घडत असतात ज्यांची आपल्याला कल्पना देखील नसते. तिचे खर रूप आपल्याला माहीत नसते. पण त्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असलेल्या लोकांना मात्र त्या इंडस्ट्रीतील सगळ्या गोष्टी माहिती असतात.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्री मध्ये नाव कमावण्यासाठी कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागते. परंतु गोष्ट जेव्हा अभिनेत्रीं बद्दल असते तेव्हा त्यांना आपले अभिनय कौशल्य तर दाखवावेत लागते पण त्यासोबतच असे म्हणतात अभिनेत्रींना फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम मिळवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊचसारख्या गोष्टी घडत असतात.

ही इंडस्ट्री इतकी मोठी आणि अवाढव्य आहे की या मध्ये हरॅसमेंट आणि कास्टिंग काउचचे अनेक प्रकार रोज समोर येत असतात. याचे कारण आहे रोज लाखो तरुण तरुण्या या चंदेरी दुनियेची स्वप्न घेऊन या इंडस्ट्री मध्ये येतात पण सगळ्यांनाच संधी मिळतेच असे नाही.

मग अशा वेळेस छोटा मोठा का होईना परंतु आपल्याला काहीतरी काम मिळावं या हव्यासापोटी अनेक अभिनेत्र्या अशा प्रकारचं कोंप्रोमाईज करायला तयार होतात. त्यांची इच्छा असो व नसो पण या ग्लॅमर च्या दुनियेत टिकून राहण्यासाठी अशी पाऊले उचलली जातात पण त्यावर खुप कमी लोक बोलत असतात.

पण जशा नाण्याच्या दोन बाजू असतात तसेच प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. पण इंडस्ट्रीमध्ये या सर्व प्रकरणाच्या एकाच बाजूबद्दल चर्चा होत असते. दुसरी बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न मात्र कोणी करत नाहीये. अशा प्रकारचं मत एका सुप्रसिद्ध बॉलिवूड निर्मातीने मांडलं आहे ज्याबद्दल सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. आणि ती सुप्रसिद्ध निर्माती आहे एकता कपूर.

एकता कपूरने एका मुलाखतीमध्ये कास्टिंग काऊच या प्रकारावर आपले मत मांडले आहे. ती म्हणाली की, ‘या क्षेत्रात लै-गिंक शो-षण होत असले तरी केवळ निर्माते त्यांच्या पदाचा फायदा घेत नाहीत.तर कलाकारही काम मिळवण्यासाठी लैं-गिक सं-बंध ठेवण्यास तयार होत असतात. असे धक्कादायक विधान तिने केले आहे.’

नेहमी निर्माते त्यांचा नावाचा आणि पदाचा फायदा घेऊन नव्या कलाकारांचा फायदा घेतात. असे बोलले जाते पण ते पुर्ण सत्य नाही. अनेक वेळा कलाकारच लवकरात लवकर फेम मिळवण्यासाठी वाटेल त्या ऑफर्स घेऊन त्यांच्याकडे येतात. आणि मग नंतर काही वर्षांनी त्यांना पुन्हा चर्चेमध्ये राहण्यासाठी असे प्रकरण उकरून काढतात. टाळी कधी एका हाताने वाजत नाही.

टीव्हीची ड्रामा क्वीन या नावाने ओळखली जाणारी 43 वर्षीय एकता कपूर नुकतीच एक मुलाची आई बनली आहे. तिचा हा मुलगा 5 पाच दिवसांपूर्वी 27 जानेवारीला सरोगसीद्वारे जन्माला आहे. एकता, बालाजी टेलीफिल्म्सची जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे. मात्र 17 व्या वर्षी आपले करियर सुरु करणारी एकता सुमारे 92 कोटी रुपयांच्या प्रॉपर्टीची मालकिन आहे.

एकता कपूर तशी तर आपल्या पेरेंट्ससोबत जुहू येथील ‘कृष्णा बंगलो’ मध्ये राहते. पण तिने 2012 मध्ये मुंबईत एक लग्झरी घर खरेदी केले होते. या रियल एस्टेट प्रॉपर्टीची किंमत सुमारे 6.5 कोटी रुपये आहे. त्याबरोबरच एकता कपूरने सुमारे 43 कोटी रुपये पर्सनल इन्वेस्टमेंटही करून ठेवली आहे.

एकताने आपल्या सासू सुनेच्या सीरियलमधून खूप प्रसिद्धी मिळवली. तिच्या प्रोडक्शनच्या बॅनरखालील काही सीरियलमध्ये ‘हम पांच’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहानी घर-घर की’, ‘कसौटी जिंदगी की’, ‘कहीं किसी रोज’, ‘कभी सौतन कभी सहेली’, ‘कहीं तो होगा’, ‘किस देश में है मेरा दिल’, ‘कसम से’, ‘कुमकुम’, ‘कुटुम्ब’, ‘बंदिनी’ अशा मालिकांची निर्मिती केली.

तसेच ‘बड़े अच्छे लगते हैं’, ‘जोधा अकबर’, ‘मेरी आशिकी तुमसे ही’, ‘ये है मोहब्बतें’ या सामील आहेत. सीरियल ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कुमकुम’ आणि ‘कहानी घर-घर की’ ने एकताला छोट्या पडद्याद्वारे घराघरात ओळख मिळवून दिली.