वयाच्या 16 व्या वर्षी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी ही नायिका, आता 3 मुलांना जन्म देऊन काढतीये अस आयुष्य…

अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणारी रंभा आता 44 वर्षांची झाली आहे. आंध्र प्रदेशातील विजवाडा येथे जन्मलेल्या रंभाचा जन्म ५ जून १९७६ रोजी झाला. रंभाचे खरे नाव विजयालक्ष्मी आहेे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये आपली ओळख निर्माण करणाऱ्या रंभाने तेलगू चित्रपटसृष्टीतून आपल्या करिअरची सुरुवात केली होती.

रंभाने तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात ओक्टी अडक्कू (तेलुगु चित्रपट) मधून केली होती. रंभाने एकूण 17 बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर तिने 100 हून अधिक दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचबरोबर रंभा आता फिल्मी दुनियेपासून दूर असून ती तिचा सर्व वेळ कुटुंबाला देत आहे.

रंभाचा शेवटचा चित्रपट २०१० मध्ये आला होता. त्या चित्रपटाचे नाव होते पेन सिंगम. या चित्रपटानंतर तिने चित्रपट जगताचा निरोप घेतला. आणि 8 एप्रिल 2010 रोजी इंद्रन पद्मनाथन या कॅनेडियन उद्योगपतीशी लग्न केले. इंद्रनशी लग्न केल्यानंतर रंभा पतीसोबत कॅनडाला शिफ्ट झाली.

लग्नाच्या वर्षभरानंतर जानेवारी २०११ मध्ये रंभाने मुलीला जन्म दिला. जीचे नाव लान्या आहे. 4 वर्षांनंतर म्हणजेच मार्च 2015 मध्ये धाकटी मुलगी साशाचा जन्म झाला आणि त्यानंतर सप्टेंबर 2018 मध्ये रंभा आणि इंद्रन यांनी तिसरे अपत्य म्हणून एका मुलाला जन्म दिला.2008 मध्ये रंभाच्या आ’त्मह’त्येची बातमी आली होती.

परंतु, रंभाला बे’शुद्ध अव’स्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेनंतर रंभाने आ’त्मह’त्येचा प्रयत्न केल्याची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये पसरली. रंभाने नंतर या वृत्ताचे खंडन केले होते. रंभा म्हणाली होती की, मी कधीही आ’त्मह’त्येचा प्रयत्न केला नाही.

रंभाने सांगितले की त्यांच्या घरी लक्ष्मीपूजन होते आणि त्यांनी दिवसभर कडक उपवास ठेवला होता. ती पूढे म्हणाली की दुसऱ्याच दिवशी मला शूटिंगला जायचे होते त्यामुळे मी थोडा नाश्ता केला होता. त्यानंतर मी शूटिंगसाठी पोहोचले आणि शूटिंगदरम्यान तिथेच बेशुद्ध पडले. यानंतर मला तिथल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

रंभा जेव्हा फक्त 16 वर्षांची होती, तेव्हा तिने मल्याळम चित्रपट सरगममधून पदार्पण केले होते. बॉलीवूडमध्ये पहिल्यांदा तीने 1995 मध्ये जल्लाद या चित्रपटात काम केले होते. यानंतर तीने दानवीर, जंग, कहर, जुडवा, सजना, घरवाली बहरवाली, बंधन, मैं तेरे प्यार में पागल, क्रोध, बेटी नंबर वन, दिल ही दिल में, प्यार अशा अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली.