या सुप्रसिद्ध अभिनेत्र्यांनी केलंय इतक्या वेळा लग्न. शेवटचीने तर तोडले सारे रेकॉर्ड..

‘विवाह’ हा भारतीय समाजाच्या जीवनशैलीतील एक अविभाज्य तसेच अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आपल्या समाजात प्रत्येकाला विवाह करणे बंधनकारक नसले तरी प्रत्येकाला एक असा जोडीदार हवाच असतो ज्याच्यासोबत आपण आपलं उरलेलं जीवन व्यतीत करू शकतो. तरीही असे अनेक व्यक्ती आहेत जे विवाह न करता आपले जीवन व्यतीत करतात पण काही असेही असतात ज्यांना योग्य जोडीदाराच्या शोधात एकापेक्षा अधिक विवाह करावे लागतात.

आपल्या समाजात एकदा का माणूस विवाह बंधनात अडकला तर हे नाते दोघीणमध्ये आयुष्यभरासाठी जोडले जाते. पण चित्रपट सृष्टी विषयी बोलायचे झाले तर असे बरेच तारे- तारका आहेत ज्यांनी आपले जीवन एकत्र व्यतीत करण्याचा निर्णय घेतला व ते आजही सफल आहेत. उदाहरणार्थ अमिताभ-जया, धर्मेंद्र-हेमा मालिनी, सैफ- करीना, रणवीर- दीपिका असे अनेक जोडपे आहेत जे आजही सुखी संसार करत आहेत.

पण बॉलिवूड मध्ये असेही काही तारे आहेत ज्यांनी लग्नाच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. वास्तविक आज आम्ही तुम्हाला अशा अभिनेत्रींविषयी सांगणार आहोत ज्यांनी आपल्या जीवनात एक नव्हे तर एकापेक्षा अधिक विवाह केले आहेत. चला अशा अभिनेत्रींबद्दल जाणून घेऊ ज्यांनी एकापेक्षा जास्त लग्न केले आहेत. अभिनेत्रींच्या या यादीमध्ये आपण अशी नावे ऐकणार आहोत जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

बिंदिया गोस्वामी: सर्वप्रथम सुप्रसिद्ध अभिनेत्री बिंदिया गोस्वामी बद्दल बोलूयात. ही अभिनेत्री सर्वपरिचित आहे तसेच लोक तिच्या सौंदर्याचे दिवाने होते. बॉलिवूड इंडस्ट्रीत ती अशा लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्यांनी 2 लग्ने केली आहेत. बिंदिया गोस्वामीने पहिले लग्न विनोद मेहरा सोबत केले. परंतु काही वर्षांत त्यांच्यात वादविवाद होऊ लागला आणि त्यांना वेगळे व्हावे लागले. नंतर काही वर्षांनी त्यांनी दुसरे लग्न ज्योती प्रकाशशी केले आहे.

नीलम कोठारी: आता आपण 90 च्या दशकातील एका अभिनेत्रीबद्दल बोलूया जीचे नाव नीलम कोठारी आहे आणि ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. या अभिनेत्रीने देखील आयुष्यात 2 वेळा विवाहसोहळा रचला. पहिल्यांदा यूके मधील एका व्यावसायिका सोबत तर नंतर अभिनेता समीर सोनी सोबत. पहिल्या लग्नानंतर नीलमला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला, त्यामुळे तिने वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर तिने दुसरे लग्न करण्याचा विचार केला.

योगिता बाली: आता आपण बोलणार आहोत चित्रपट जगातील नामांकित अभिनेत्री म्हणून काम करणार्‍या बॉलिवूड अभिनेत्री योगिता बाली विषयी. तुम्हाला आश्चर्य वाटेल की योगिताही दोन वेळा विवाहबंधनात अडकली. योगीताचे पहिले लग्न सुप्रसिद्ध गायक किशोर कुमार यांच्या सोबत झालं होतं. परंतु काही वर्षांत दोघांमध्ये बिनसलं. परिणामी दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

किशोर कुमार यांच्या सोबत झालेल्या डी-व्होर्स नंतर काही काळ गीता यांनी एकटेपनात व्यतीत केला. नंतर त्यांच्या आयुष्यात सुप्रसिद्ध अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची एन्ट्री झाली. दोघांचं चांगलं जमू लागलं व मैत्रीचं रूपांतर प्रेमात होऊन नंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. अशाप्रकारे गीता बाली 2 वेळा विवाहबंधनात अडकल्या.

नीलिमा अझीम: आता आपण नीलिमा अझीमबद्दल बोलूया, जी चित्रपट जगातील नामांकित अभिनेत्रींपैकी एक आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे या अभिनेत्रीने एक-दोन नव्हे तर तब्बल 3 वेळा विवाह केले आहेत. माहितीसाठी सांगू इच्छितो की त्यांनी आधी पंकज कपूरसोबत, दुसरे राजेश खट्टर व तिसरे उस्माद रझा अली खानसोबत लग्न केले आहे. नीलिमाच्या आयुष्यातील हा एक अतिशय कठीण काळ होता. त्यांना योग्य जोडीदाराच्या शोधात 3 वेळा लग्न करावे लागले

जेबा बख्तीयार: जरी आज लोक जेबाला नावाने कमी ओळखत असतील तरी तिच्या अदाकारीचे अनेक चाहते आहेत. जेबाने सलमान खानबरोबर काम केले आहे. एवढेच नाही तर अभिनेत्री जेबा बख्तियार हिने ‘हिना’ या चित्रपटात दिवंगत ऋषी कपूर यांच्यासोबत देखील काम केले. जेबा बख्तियार ही एक पाकिस्तानी अभिनेत्री आहे.तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की जेबा बख्तियारने तब्बल 4 लग्ने केली आहेत. पहिले लग्न अदनान समी बरोबर, दुसरे जावेद जाफरी, तिसरे सलमान वलियानी आणि चौथे सोहेल खान लेगहारी यांच्याशी झाले आहे.