पदार्पणातूनच प्रसिद्ध झालेल्या या अभिनेत्रीला तिच्या नवीन लूकमध्ये ओळखंणही झालंय कठीण.. सोशल मीडियावर फोटॊ व्हायरल..

‘गँग ऑफ वासेपूर 2’मधून  अभिनेत्री हुमा कुरेशीने बॉलिवूडमध्ये  पदार्पण केले. हुमाने आत्तापर्यंत एक थी डायन,लव शव ते चिकन खुराना,बदलापूर2, आणि जॉली एलएलबी2 अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.

लवकरच ती सोनी लिव्हवर प्रदर्शित होणाऱ्या ‘महारानी’ या सिरिजमध्ये दिसणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेतील हुमाचा दमदार लूक समोर आला आहे. यात हुमाला ओळखणंही कठीण जातेय.

हुमा कुरेशी म्‍हणाली, ”मी शो लवकरच सुरू होण्‍यासाठी खूपच उत्‍सुक आहे. ट्रेलरला खूपच उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आणि मला खात्री आहे की या शोच्‍या माध्‍मयातून प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन होईल. रानी भारतीची भूमिका बहुआयामी आहे.

या भूमिकेमध्‍ये विविध छटा सामावलेल्‍या आहेत. म्‍हणूनच ही भूमिका साकारताना खूपच सन्‍माननीय वाटत आहे. भूमिकेमध्‍ये सामावून जाण्‍यासाठी आम्‍ही विविध लुक्‍सचा प्रयत्‍न केला, ज्‍यामुळे तिच्‍या जीवनातील टप्‍प्‍यांना सादर करण्‍यामध्‍ये मदत झाली.”

निरक्षर असूनही प्रत्‍येक गोष्‍टीचे बारकाईने निरीक्षण करण्‍यापर्यंत बुद्धीकौशल्‍य असलेली, तसेच प्रामाणिक असण्‍यासोबत कुटुंबावर घोंघावणा-या धोक्‍याबाबत लढाऊ वृत्ती असलेली रानी भारती लक्षवेधक विरोधाभास असलेली महिला आहे.

तिच्‍या पतीने घेतलेल्‍या निर्णयानंतर तिच्‍या जीवनात अडथळे निर्माण होतात. गायींचे दूध काढणे, शेण थापणे ते सर्व विषमतांवर मात कुटुंबाचे संरक्षण करणे अशा अनेक गोष्‍टी तिला कराव्‍या लागतात. भविष्‍यात तिच्‍याबाबतीत काय घडणार आहे, हे एक रहस्‍य आहे, ज्‍याचा उलगडा लवकरच होईल. 

करन शर्मा यांचे दिग्‍दर्शन आणि सुभाष कपूर यांची निर्मिती असलेल्‍या या शोमध्‍ये सोहम शाह, अमित सियाल व विनीत कुमार प्रमुख भूमिकेत आहेत. नरेन कुमार व डिम्‍पल खारबंदा यांची निर्मिती असलेली ‘महारानी’ ही काल्‍पनिक सिरीज आहे. २८ मे रोजी फक्‍त सोनी लिव्‍हवर प्रदर्शित झाली आहे

.