अक्षय कुमारच्या ‘ह्या’ अभिनेत्रीचं एका चुकीमुळे झालं करिअर बरबाद.. एकाच वेळी 2 अभिनेत्यांसोबत होती लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये..

अभिनय क्षेत्रात मग ते सिनेमा असो, किंवा टीव्ही सीरिअल्स रोजच हजारो लोक या चंदेरी दुनियेत सुपरस्टार बनण्याचं स्वप्न घेऊन येत असतात.. काहींचं स्वप्न पूर्ण होतं.. अनेकांच्या पदरी मात्र निराशा लागते. काही कलाकार असेही असतात ज्यांना त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात बऱ्यापैकी यश मिळतं, परंतु नंतर मात्र काळाच्या ओघात ते विस्मरणात जातात.

1990 च्या दशकात अशे अनेक कलाकार बॉलिवूड मध्ये आले. हा काळ खरंतर अभिनेत्र्यांसाठी खडतर होता कारण दार चित्रपटामागे एका नवीन अभिनेत्रीचा चेहरा समोर येत होता. अशातच काही अभिनेत्र्या येऊन गेल्या ज्यांनी आपल्या कामगीरीने चमक तर दाखवली.. परंतु नंतर मात्र त्या विस्मरणात गेल्या..

आज आपण एका अशाच अभिनेत्री बद्दल जाणून घेणार आहोत जिने 1990 च्या दशकात बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. आपल्या सुंदरतेची जोरावर अनेक सुपरहिट चित्रपट केले. परंतु नंतर मात्र तिला आपली जादू कायम ठेवत आली नाही आणि काही चुकांमुळे आपले करिअर गमावून बसली. आम्ही बोलत आहोत अभिनेत्री आयेशा झुलका बद्दल.

डोळ्यांत भरपूर स्वप्ने साठवून आयशाने 1983 मध्ये या मायानगरीत पाऊल ठेवले. वयाच्या अकराव्या वर्षी ‘कैसे कैसे लोग’ (1983) या सिनेमाद्वारे आपल्या फिल्मी करिअरला तिने सुरुवात केली. 2010सालापर्यंत फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या आयशाने आपल्या 27 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये 52हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला. आपल्या फिल्मी करिअरमधला पहिला सिनेमा केल्यानंतर आयशाने सात वर्षांचा दीर्घ ब्रेक घेतला. त्यानंतर 1990 पासून सुरु केलेला प्रवास 2010पर्यंत सुरु ठेवला.

हिंदीसोबतच आयशाने तामिळ, तेलगू, ओडिया आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केले आहे. आयशाने जो जिता वो सिकंदर, खिलाडी, मासूम, अकेले हम अकेले तुम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. ११९३ मध्ये प्रदर्शित ‘दलाल’ या चित्रपटात आयशा व मिथुन यांची जोडी जमली. याच चित्रपटाच्या सेटवर दोघांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. मिथुन तेव्हा विवाहित असूनही हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागल्याची चर्चा त्यावेळी रंगली. पण हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही.

दलाल’ या चित्रपटात मिथुन व आयशावर अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले. या चित्रपटातील डबल मिनिंगच्या गाण्यांवरही वाद झाला होता. त्यानंतर २००३ मध्ये आयशाने ‘आंचल’ चित्रपटामध्ये काम केले. या चित्रपटामध्ये ती नाना पाटेकरसोबत काम करत होती. या चित्रपटाच्या चित्रिकारणावेळी या दोघांच्या अफेरच्या चर्चा सुरू झाल्या. पण यावर कोणीही काहीही उत्तर दिले नाही. या चित्रपटामध्ये देखील आयशा आणि नाना पाटेकर यांच्यामध्ये अनेक बोल्ड सीन्स चित्रित केले होते.

नाना आणि आयेशा देखील लिव्ह इन मध्ये राहू लागले आणि ही बाब नानाची तेव्हाची प्रेयसी मनीषा कोईराला हिला खटकली. वक्त हमारा है’ और ‘मेहरबान’ हे आयशाच्या करिअरमधील शेवटचे हिट सिनेमे आहेत. कारण यानंतर आलेले तिचे सर्व सिनेमे फ्लॉप ठरले. चुकीच्या सिनेमांची निवड तिच्या करिअला दृष्ट लावणारे ठरले. याकाळात तिने काही सिनेमे केलेत. मात्र त्या सिनेमांमध्ये आयशा सहायक अभिनेत्री म्हणून झळकली.

‘रन’, ‘चाची 420’, ‘कोहराम’, ‘सोचा ना था’, ‘उमराव जान’ या सिनेमांमध्ये तिने छोटेखानी भूमिका साकारल्या. बघताबघता आयशा फिल्म इंडस्ट्रीतून गायब झाली. सिनेमात मिळणारे अपयश बघता आयशाने आपल्या पतीच्या बिझनेसकडे लक्ष केंद्रित केले