बॉलिवूडच्या या अभिनेत्रींचे पाकिस्तानी क्रिकेटर्स सोबत होते अफेअर्स, एकीनं तर थाटला होता संसार पण..

आपणा सर्वांना ठाऊकच आहे की बॉलिवूडमध्ये बरीच ह्रदये जोडली गेली आहेत आणि तितकीच तुटलेली देखील आहेत. काही जोडप्यांचे अफेअर इतके गाजले होते की ते मीडियामध्ये बराच काळ चर्चेचा विषय ठरले होते. पण काही जोडपे असे असतात जे आपलं प्रेम प्रकरण जगासमोर येऊ देत नाही.

पण म्हणतात ना की प्रेम काही केल्या लपत नाहीच. कारण भारतीय मीडिया सध्या इतकी ऍक्टिव्ह आहे की त्यांना काही केल्या खबर लागतेच. आज आपण अशाच एका जोडप्याबद्दल बोलणार आहोत ज्यांनी आपलं प्रेम प्रकरण जगापासून लपवण्याचा भरपूर प्रयत्न केला परंतु आता ही बातमी समोर येतेय.

क्रिकेट व बॉलिवूडचे एकमेकांशी जवळचे संबंध आहेत. हे नातं कित्येकदा सीमेच्या पलीकडेदेखील गेलं आहे. बॉलिवूडच्या कित्येक अभिनेत्रींचा जीव भारताच्या सीमेच्या पलिकडे असलेल्या पाकिस्तानी क्रिकेटर्सवर आले होतं तर कधी भारतीय अभिनेत्रींच्या प्रेमात वेडे झाले होते हे क्रिकेटर्स. काही प्रेम कथा सुरू झाल्या पण त्याची कथा अपूर्णच राहिली.   

रिना रॉय व मोहसीन खान: अभिनेत्री रिना रॉय हिने बॉलिवूडमधील करियरला रामराम करत पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत लग्न केले होते. मात्र हे नातं जास्त काळ टिकू शकले नाही. दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले. रिना व मोहसीन यांना एक मुलगी आहे जिचे नाव सनम आहे. त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव सनम तेरी कसम या चित्रपटावरून ठेवले होते. सनमची कस्टडी रिनाकडे आहे.

शोएब अख्तर व सोनाली बेंद्रे: पाकिस्तानी फास्ट बॉलर शोएब अख्तरला अभिनेत्री सोनाली बेंद्रे खूप आवडत होती. शोएब अख्तरने हेदेखील सांगितले होते की सोनालीने जर होकार नाही दिला तर तिला किडनॅप करून घेऊन जाईन. मात्र याबद्दल सोनाली कडून विधान आले नाही. नंतर सोनालीने गोल्डी बहलसोबत लग्न केले.

सुष्मिता सेन व वसीम अकरम: अभिनेत्री सुष्मिता सेनचे नाव पाकिस्तानी क्रिकेटर वसीम अकरम यांच्यासोबत जोडले गेले होते. दोघांची भेट एका टीव्ही रिएलिटी शोवेळी झाली होती. ते दोघे या शोचे परीक्षक होते. शोनंतर पार्टी व इव्हेंटमध्ये सुष्मिता व वसीम अकरम बऱ्याचदा एकत्र दिसायचे. दोघांचे नाते फक्त सहा महिनेच टिकले. ते दोघे लग्न देखील करणार होते.

जीनत अमान व इमरान खान: जीनत अमान तिच्या काळात हॉट अभिनेत्री होती. तिचे अफेयर्सचे किस्से बऱ्याच सेलिब्रेटींसोबत होते. मात्र जीनत अमान व इमरान खान यांच्या प्रेमाची चर्चा मी़डिया व बॉलिवूडमध्ये खूप गाजले होते. त्यावेळी पाकिस्तानी क्रिकेटर इमरान खानदेखील हॅण्डसम व स्मार्ट होता. जीनत एका टूरच्या निमित्ताने पाकिस्तानला गेली होती. तिकडे तिची भेट इमरानसोबत झाली. मात्र त्या दोघांचे नाते जास्त काळ टिकू शकले नाही.