जेव्हा ‘या’ लैंगिक समस्येमुळे बिग बींची नात नव्या पोहोचली डॉक्टरांकडे..

महानायक अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाबाबतही प्रेक्षकांमध्ये कायमच कुतूहल असतं. बच्चन यांच्या कुटुंबातील बरेच चेहरे माध्यमांद्वारे चाहत्यांच्या भेटीला येतात. पण, त्यांची नात मात्र या झगमगाटापासून शक्य तितकी दूर राहण्याचा प्रयत्न करते.

काही कार्यक्रमांना असणारी तिची उपस्थिती मात्र या साऱ्याला अपवाद ठरते. हल्लीच बिग बींच्या या नातीनं, म्हणजेच नव्या नवेली नंदा हिनं आपल्या आईसोबत असणाऱ्या नात्याचा उलगडा केला. सोबतच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर सर्वांचं लक्ष वेधलं.

मनातील प्रश्नांचा काहूर पाहता, एका स्त्रीरोगतज्ज्ञांची भेट घेतल्यानंतर आपल्याला कशा प्रकारे संकोचलेपणा वाटला आणि आई, श्वेतानं आपल्याला कशा प्रकारे SEX शा संबंधित प्रश्नांची उत्तरं दिली, यावर खुलेपणानं काही गोष्टी सांगितल्या.

आई- मुलीच्या नात्याचा सातत्यानं उलगडा करणाऱ्या नव्यानं एक व्हिडीओ पोस्ट केला. यामध्ये किशोरवयीन काळात आपल्याला कशा प्रकारे सेक्सशी संबंधीत प्रश्न पडत होते, याबाबत माहिती देताना दिसली.

मानवी शरीराला योग्य पद्धतीने जाणून घेण्यासाठी नव्या एका स्त्रीरोगतज्ज्ञाकडे गेली होती. पण, तिथून परतल्यानंतर तिच्या मनात आणखी प्रश्न आणि संकोचलेपणानं घर केलं.

यानंतर नव्याला तिची ‘आरा हेल्थ’ ही कंपनी सुरु करण्याची कल्पना सुचली. भारतीय महिला ‘अशा’ प्रश्नांमुळं कशा प्रकारे संकोचतात याची जाणीव तिला झाली होती.

याच जाणिवेतून नव्याला एक कल्पना सुचली आणि एका नव्या कंपनीचा उदय झाला. तिच्या या कंपनीच्या माध्यमातून लैंगिक शिक्षण, समज आणि गैरसमज, मासिक पाळी, लैंगिक संबंधांबाबतच्या गैरसमजुती या सर्व गोष्टींचं योग्य मार्गदर्शन केलं जातं.