‘तारक मेहता…’ मधील अभिनेत्याच्या निधनाची अफवा; अखेर सत्य समोर आलं

तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेत अनेक कलाकार आहेत. सगळ्याच कलाकारांच्या भूमिका या उत्कृष्ट अशा आहेत. आत्माराम तुकाराम भिडे, जेठालाल, चंपकलाल, तारक मेहता, बबिता, अय्यर माधवी भाभी, अंजली भाभी आणि इतर भूमिका देखील लोकप्रिय अशा आहेत.

मात्र, गेल्या काही दिवसांपासून अनेक अफवा या मालिकेच्या बाबतीत उडताना दिसत आहे. त्यामुळेच या मालिकेतील कलाकार देखील नाराज झाले आहेत, असे सांगण्यात येत आहे. काही दिवसापूर्वी तारक मेहता ही भूमिका साकारणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडली असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे.

मात्र, याबाबत अद्याप शैलेश लोढा यांनी काहीही माहिती दिली नाही. त्यामुळे या मालिकेविषयी अफवा का उवण्यात येत आहेत, अशी देखील विचारणा करण्यात येत आहे. अतिशय विनोदी अंगाने तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या 13 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेत दयाबेन म्हणजेच दिशा वकानी हिने ही मालिका काही वर्षांपूर्वी सोडली.

ती अजूनही या मालिकेत आली नाही. गरोदरपणाचे कारण देत तिने ही मालिका सोडली होती. मात्र, मानधनाच्या वादावरून तिने ही मालिका सोडली असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मालिकेत तिची कमी दिसत नाही. याचे कारण म्हणजे इतर सगळे कलाकार अतिशय जबरदस्त भूमिका करतात. यांच्यामध्ये असलेले नाते हे प्रेक्षकांना पडद्यावर पाहायला खूप आवडते.

त्याच प्रमाणे शैलेश लोढा यांनी तारक मेहता ही भूमिका अतिशय चांगल्या प्रकारे साकारली आहे. टप्पू सेना मधील सगळेच मूल चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. तेरा वर्षात मुलं देखील आता मोठे झाले आहेत.

आता या मालिकेमध्ये आत्माराम तुकाराम भिडे हे गोकुलधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहेत. ही भूमिका अभिनेते मंदार चांदवडकर यांनी साकारली आहे. मंदार चांदवडकर हे अतिशय जबरदस्त असे अभिनेते आहेत. या आधी ते नोकरी करायचे. मात्र, अभिनय क्षेत्राकडे असलेला ओढा पाहून त्यांनी नोकरी सोडली आणि या क्षेत्रांमध्ये आता ते रममाण झालेले आहेत.

मात्र, त्यांच्या बाबतीत मी एक बातमी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे. आत्माराम तुकाराम भिडे यांचे निधन झाले, असे सांगणारी ही बातमी होती. याबाबत मंदार चांदवडकर यांनी आपल्या चाहत्यांना सांगितले की, अशी कुठलीही घटना घडली नाही. 17 मे रोजी त्यांनी लाईव्ह सेशन घेतले होते. माझ्या निधनाची बातमी माझ्यापर्यंत आली. त्यामुळे मला खूप आश्चर्य वाटले. मी मला कामामध्ये व्यस्त आहे.

अशा बातम्या कोणीही करू नये, असे आवाहन देखील त्यांनी चाहत्यांना केले आहे. या आधी देखील अनेक कलाकार यांच्या निधनाच्या बातम्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत होत्या. शिवाजी साटम यांच्यासह अनेक अभिनेता आणि अभिनेत्री यांना याचा फटका बसला आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका आपल्याला आवडते का ते आम्हाला सांगा.