वयाच्या 52 व्या वर्षी सलमानच्या या अभिनेत्रीचा Bold अंदाज, स्विमिंग पुलमधील Photo Viral

‘मैंने प्यार किया’ चित्रपटातील सलमान खानची (Salman Khan Maine Pyar Kia) हिरॉईन अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल माडियावर बरीच सक्रीय आहे. या चित्रपटानंतर तिने मोजकेच चित्रपट केले आणि बॉलिवूडला रामराम केला.

आता ती काही चित्रपटांतून परत आली आहे. ती सोशल मीडियावर फोटो शेअर करून फॅन्सच्या संपर्कात असते. भाग्यश्री आता 52 वर्षांची झाली असली तरी ती तेवढीच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. लवकरच तिची मुलगी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असल्याच्या चर्चा आहेत.

परंतु सध्या भाग्यश्री चर्चेत असण्याला कारण तिचा एक हॉट फोटो आहे. तिनं स्विमिंग पूलमध्ये पोज देतानाचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत तिने निळ्या रंगाची मोनोकिनी घातलेली दिसत आहे. भाग्यश्रीचा हा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे.

फोटोत निळ्या रंगाची मोनोकिनी घातलेली भाग्यश्री खूप हॉट दिसते आहे. या फोटोत भाग्यश्रीचा हॉट अंदाज आणि बोल्ड स्टाइल पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत भाग्यश्रीने एक खास कॅप्शनही लिहिली आहे. तिने लिहिलं आहे की, ‘ My kinda #mondayblues!’ पुढे ती लिहिते, ‘मी खरीखुरी मीन राशीची आहे.

मला पाणी खूप आवडतं. मग तो महासागर, समुद्र, नदी किंवा तलाव असो. लाटांचा आवाज असो, पाण्याचे तरंग असोत किंवा पाण्याचे शिंतोडे असोत ते मला प्रचंड आवडतात. पाण्याचा आवाज, त्याचा स्पर्श आणि प्रत्यक्ष पाणी पाहिलं की माझ्या संवेदना जाग्या होतात. हे पाणी माझं मन प्रफुल्लित करतं, शरीराला टवटवीत करतं आणि माझ्या मनाला शांतताही देतं.’

भाग्यश्रीचा मोनोकिनीतील हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या फॅन्सना तिचा हा फोटो खूप आवडल्याचं दिसतंय. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट्स केल्या आहेत. भाग्यश्रीच्या कामाबदद्ल बोलायचं झालं तर ती लवकरच दक्षिणेतल्या ‘राधे श्याम’ या सिनेमात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता प्रभास आणि पूजा हेगडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

त्यापूर्वी भाग्यश्री शेवटची ‘थलायवी’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट दक्षिण सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांचा बायोपिक होता. या चित्रपटात अभिनेत्री कंगना रणौतनं जयललिता यांची भूमिका साकारली होती. तर भाग्यश्रीने जयललिता यांच्या आईची भूमिका साकारली होती.

भाग्यश्रीने 1989 साली सलमान खानसोबत ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाद्वारे तिच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर ती मोजक्याच चित्रपटांमध्ये दिसली. लग्नानंतर ती चित्रपटांपासून दूर गेली होती. परंतु अलीकडच्या काही वर्षांत ती चित्रपटांमध्ये आणि काही कार्यक्रमांमध्ये हजेरी लावताना दिसते.