‘या’ अभिनेत्रीला जबरदस्ती किस करणं फॅन ला पडलं महागात.. अभिनेत्री आली कोरोना पॉजीटिव्ह ..

बिग बॉस 14’च्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतला टक्कर देणारी अर्शी खान सतत या ना त्या कारणाने चर्चेत असते. नुकताच या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. सगळ्यांशी पंगा घेण्यासाठी तयार असलेल्या अर्शीसोबत एका चाहत्याने असे काही केले की, ज्याची कुणी कल्पनाही करू शकत नाही.

होय, अर्शी खान एअरपोर्टवर मीडियाशी बोलत होती. तो आला आणि अचानक अर्शी खानला किस करून तिथून निघून गेला. तिचा हाच व्हिडीओ सध्या चर्चेत आहे.सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर शेअर केला होता. पण हे प्रकरण त्या चाहत्यांच्या चांगलंच अंगलट येणार असे दिसून येतंय.

अर्शी खान एअरपोर्टवर मीडियाशी बोलत असताना अचानक एक चाहता तिच्याजवळ आला आणि तिच्यासह फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केी. अर्शीने देखील चाहत्याला नाराज न करता फोटो काढण्यास रेडी झाली. फोटो काढत असताना त्या चाहत्याने असे काही केले की अर्शी खानचीही काही वेळेसाठी भबेरी उडाली होती

तिला काही कळेल तितक्यात चाहता अर्शीला किस करून तिथून निघून गेला. या चाहत्याचा व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा किस्सा घडल्या त्याच्या दोनच दिवसानंतर अर्शी खानला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.

अर्शीला किस करुन गेलेला चाहता हा कोरोना रुग्ण होता का? त्याच्यामुळे अर्शीला कोरोनाचा संसर्ग झाला का असे तर्क वितर्क लावले जात आहे. अर्शीला कोरोनाची लागण झाल्याचे तिने स्वतः सोशल मीडियावर सांगितले आहे. सध्या की घरीच उपचार घेत आहे. दरम्यान अर्शी लवकरात लवकर बरी व्हावी असे चाहते प्रार्थना करत आहे. तिलाही योग्य काळजी घेण्यास सांगत आहेत.

अर्शी खान सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. अर्शीने इन्स्टाग्राम 1.4 मिलियन फॉलोअर्स आहेत. अर्शी खान मात्र केवळ 90 लोकांना फॉलो करते.अर्शी आपल्या चाहत्यांसाठी रोज नवे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.अर्शी खानने बिग बॉसच्या 11 व्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. या सिझननंतर पुन्हा एकदा या सिझनमध्ये अर्शीला बिग बॉसच्या घरात एंट्री मिळाली होती. बिग बॉसमुळे अर्शी खानला बरीच लोकप्रियता लाभली आहे. त्यामुळेच शोमधून बाहेर पडताच तिने लूकवर मेहनत घेत स्वतःचा मेकओव्हर केला होता.

बिग बॉस शो नंतर प्रकाशझोतात आलेल्या अर्शी खानला जरी मोठे प्रोजेक्ट मिळाले नसले तरीही अनेक फॅशन ब्रँडसाठी रॅम्पवॉक आणि फोटोशूटच्या ऑफर तिला मिळत असतात. अर्शी खानला चर्चेत राहणं आवडते. तसेच, तिनं अनेकदा ऑन स्क्रिन अनेक देखण्या कलाकारांसोबत फ्लर्ट केलं आहे. बिग बॉस 14 मधील रुबीना दिलक यांचे पती अभिनव शुक्ला, अली गोनी आणि राहुल वैद्य यांच्याबरोबर तिनं बर्‍याच वेळा फ्लर्ट केलं आहे. मात्र ती अजून पर्यंत अविवाहितच राहिली.