‘या’ कारणामुळे अर्जुन कपूर करतोय मलायकासोबत ब्रेक-अप ? रोज करावं लागतं-

अरबाज खानला घटस्फोट दिल्यानंतर मलायका अरोराच्या (Malaika Arora)आयुष्यात अर्जुन कपूरची (Arjun Kapoor) एन्ट्री झाली होती. गेल्या चार वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये होते. पण तूर्तास मलायका व अर्जुन यांचा ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. हे कपल लवकरच लग्न करणार असं मानलं जात असताना अचानक त्यांच्या ब्रेकअपची बातमी आल्याने चाहत्यांनाही धक्का बसला आहे.

मलायका व अर्जुन ब्रेकअपबद्दल अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण चर्चा खरी मानाल तर अर्जुनने मलायकासोबतचे सर्व संबंध तोडले आहेत. या ब्रेकअपचं कारण काय, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण अर्जुनने कुटुंबाच्या दबावामुळे मलायकाला दूर केल्याच्या चर्चा आहेत.बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, अर्जुन कपूरचे कुटुंब मलायकाला फार पसंत करत नाही.

त्यामुळे रिलेशनशिपमध्ये असतानाही अनेक वर्ष मलायकाला अर्जुनच्या फॅमिली फंक्शनमध्ये एन्ट्री मिळाली नव्हती. अर्जुनने मलायकाला सोडून आपल्या वयाच्या मुलीसोबत संसार थाटावा, अशी त्याच्या कुटुुंबाची इच्छा आहे. याच दबावामुळे अर्जुन व मलायकाचा ब्रेकअप झाल्याचं मानलं जातंय.

अर्जुन कपूर बोनी कपूर यांचा सर्वात मोठा मुलगा आहे. अर्जुनने लवकरात लवकर लग्न करावं, अशी सर्वांची इच्छा आहे. पण मलायका त्याच्यापेक्षा वयाने बरीच मोठी आहे. शिवाय एका तरूण मुलाची आईआहे. अशात मलायकाला सून म्हणून स्वीकारणं अर्जुनच्या कुटुंबासाठी जरा कठीण आहे. कदाचित  मलायका व अर्जुनच्या ब्रेकअपमागे हेच कारण असण्याची शक्यता आहे. अर्जुन च्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध आहे आणि त्यामुळे अर्जुनला रोज च कुटुंबाचा विरोध मान्य करावा लागतो आहे.

‘बॉलिवूड लाईफ’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार,  गेल्या सहा दिवसांपासून मलायका तिच्या घराबाहेर पडलेली नाही. अगदी तिने स्वत: घरात कोंडून घेतलं आहे. सूत्रांनी सांगितल्यानुसार, मलायका सध्या प्रचंड दु:खी आहे आणि कठीण काळातून जात आहे. गेल्या सहा दिवसांत अर्जुनही तिला भेटायला गेलेला नाही. अर्जुनला काही दिवसांपूर्वीच कोरोना झाला होता.

पण आता त्याची टेस्ट निगेटीव्ह आली आहे. कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्यानंतर तीन दिवसांपूर्वी अर्जुन त्याची चुलत बहीण रिया कपूर हिच्या घरी डिनरला पोहोचला होता. रियाचे घर मलायकाच्या घरापासून अगदी जवळ आहे. पण   तिथे जाऊन सुद्धा तो मलायकाच्या घरी गेला नाही. डिनरनंतरही तो मलायकाला न भेटताच घरी परतला. याआधी अर्जुनच्या फॅमिली डिनरमध्ये मलायका त्याच्या सोबत दिसायची.

पण यावेळी रियाच्या घरी अर्जुनसोबत मलायका दिसली नाही. अर्थात यात किती तथ्य आहे, हे आम्हाला ठाऊक नाही. गेल्यावर्षी 1 जानेवारीला मलायकाने इन्स्टाग्रामवर अर्जुनसोबतचं नातं ऑफिशिअल केलं होतं. ‘ही एक नवी पहाट आहे, हा एक नवा दिवस आहे, हे एक नवं वर्ष आहे,’ असं म्हणत तिने अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो शेअर केला होता.