एका सिनेमाचे 5 कोटी घेणारी ही अभिनेत्री आज आहे करोडोंची मालकीण.. तिच्या ‘या’ दोन गोष्टींमुळे मिळतंय इतकं मानधन..

बाहुबली चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शेट्टीने नुकताच आपला आज 39 वा वाढदिवस साजरा केला आहे. देवसेनाच्या भूमिकेत लोकांनी तिला खूप पंसती दिली. अनुष्काचा आता चाळीशीत पदार्पण करत आहे. त्यामुळे तिचे अनेक गुपीतं आम्ही तुमच्यासमोर आणणार आहोत.

अनुष्काचे खरे नाव काय आहे हे फार थोड्या लोकांना माहित आहे. अनुष्काचे खरे नाव स्विटी शेट्टी आहे. अनुष्काच्या स्मित हस्यावरुन तिचं नाव स्विटी ठेवण्यात आलं होतं.

बाहुबली’ सिनेमात झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिची बी-टाऊनसह दाक्षिणात्य चित्रसृष्टीत सुपरडुपर हिट ठरली आहे. जादा मानधनाची मागणी केल्याच्या कारणामुळे अनुष्का शेट्टीची साहो या सिनेमातून एक्झिट झाली होती.

प्रभाससह बाहुबली आणि इतर विविध सिनेमातून झळकलेल्या अनुष्का शेट्टीला मात्र साहोमधून एक्झिट झाली तर फारसा फरक पडला नाही. मानधन तिच्यासाठी किरकोळ गोष्ट आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

आम्ही असं का म्हटलं आहे याचं कारणही अगदी तसंच आहे. कारण एका वृत्तानुसार अनुष्का शेट्टी 22 मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल 140 कोटी रुपये संपत्तीची मालकीण आहे.

अनुष्का बद्दल आणखी एक गोष्ट प्रसिद्ध आहे. तिच्या ड्रायव्हरच्या कामामुळे प्रसन्न झालेल्या अनुष्काने त्याला 12 लाख रुपयांची नवी कार भेट दिली होती. हैदराबादमधील पॉश भागात ज्युबिली हिल्समध्ये ती राहते. वुड्स अपार्टमेंटच्या सहाव्या मजल्यावर तिचं अलिशान घर आहे. 

सध्या अनुष्का एका चित्रपटासाठी 4-5 कोटी रुपये घेते. लक्झरी कारची चाहती आहे. बाहुबलीची अभिनेत्री अनुष्का शेट्टीकडे बऱ्याचं मोठ्या ब्रँडेड गाड्या आहेत. सध्या तिच्याकडे बीएमडब्लू 6, ऑडी ए 6, ऑडी क्यू 5 आणि टोयोटा कोरोला सारख्या लक्झरी कार आहेत.

2005 मध्ये प्रदर्शित झालेला तेलुगू चित्रपट ‘सुपर’ मध्ये अनुष्का पहिल्यांदा झळकली. 36 वर्षाच्या अनुष्काने रुद्रम देवी (2015), वेदम (2010), अरुंधती (2009), सिंघम आणि ‘बाहुबली’ या चित्रपटांमध्ये काम केले आहे.

.