विवाहित असून देखील ‘या’ अभिनेत्रीच्या प्रेमात पडले अनुपम खेर.. पहिल्या पत्नीला अशा अवस्थेत वाऱ्यावर सोडून केले दुसरे लग्न..

अनुपम खेर हे आता सध्या 66 वर्षाचे झाले आहेत 7 मार्च 1955 ला शिमला मध्ये जन्मलेले अनुपम चे वडील क्लर्क होते पण त्यांच्या त्या नौकरी वर भागत नसत त्यामुळे शिमलाच्या डीएवी या महाविद्यालयात शिक्षण घेऊन मुंबई मध्ये आले पण कोणतंही यश प्राप्त करणे सोपं नसत काहीच लोकांना माहिती असेल की त्यांनी त्यांचे आधीचे काही दिवस मुंबईच्या रेल्वे स्टेशन वर काढले आहेत.

रात्रीदेखील ते स्टेशन वरच झोपायचे.त्यांची सुरवातीचा चित्रपट 1984 मध्ये आलेला चित्रपट सारांश आहे या चित्रपटात 28 वर्षीय अनुपमने एक मध्यमवर्गीय निवृत्त म्हाताऱ्या माणसाचा रोल केला आहे.पण याच्या आधी पण त्यांचे 2 चित्रपट आले आहेत 1971 ला टायगर सिक्सटिन आणि 1982 ला आगमन.

अनुपम पाहिले अभिनेते आहेत ज्यांना कॉमेडी रोल साठी 5 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला आहे. आणि त्यांनी सलग 8 वेळा फिल्मफेअर अवॉर्ड जिंकले आहेत. त्यांच्या आधी बॉलिवूड मध्ये कॉमेडी क्षेत्राला इतकंसं महत्त्व दिले जात नसे. परंतु त्यांनी या क्षेत्राला नवा चेहरा दिला.

चित्रपटात खूप जास्तीचा अनुभव असल्यामुळे लोक त्यांना स्कुल ऑफ ऍकटिंग पण म्हणतात. ते नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा चे माजी विध्यार्थी आणि माजी अध्यक्ष देखील होते.त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री पुरस्कार देखील मिळाला आहे.

जर आपण अनुपम च्या वयक्तिक आयुष्याविषयी बोललो तर त्यांचे पाहिले लग्न मधुमालती सोबत झाले होते.विवाहित असून देखील ते किरण खेर यांच्या प्रेमात पडले होते.किरण देखील विवाहित आणि एका मुलाची आई होती.

खरं तर हे दोघे सोबत काम करत होते आणि त्यानंतर मग दोघे एकमेकांच्या जवळ आले आणि त्यानंतर मग दोघांनी एकमेकांच्या पतीस घटस्फोट दिला आणि एकमेकांशी लग्न केले.सिकंदर खेर हा किरण खेर च्या पाहिल्या पतीचा मुलगा होता,तो अनुपम चा सावत्र मुलगा होता.

किरण ने एक मूलखतीत सांगितले की- मी मुंबई मध्ये आली आणि गौतम बैरी सोबत लग्न केले आणि काही दिवसातच आम्हाला कळले की आमचे लग्न जास्त दिवस टिकणार नाही त्या वेळेस पण अनुपम आणि मी चांगले दोस्त होतो,एकसोबत नाटक करत होतो.मला चांगले आठवते की एकदा आम्ही नादिरा बब्बर च्या नाटकासाठी कोलकाता ला जात होतो.तेव्हा मला कळले की आमच्यातली बॉंडिंग काही वेगळी आहे.

अनुपमने त्याच्या कारकिर्दीत 500 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे.आणि ते अजून सुद्धा चित्रपटात ऍक्टिव्ह आहेत.त्यांनी त्यांच्या चार दशकाच्या कारकिर्दीत प्रत्येकप्रकारच्या चित्रपटात काम केले आहे.

अनुपमने कर्मा,तेजाब,राम-लखन,दिल,सौदागर,1942 ए लव्ह स्टोरी,रूप की राणी चोरो का राजा,हम आपके है कोण,कुछ कुछ होता है,मोहबते,विरजारा,रंग दे बसंती,खोसला का घोसला, ए वेडनेस डे,स्पेशल 26 या सारखे सुपरहिट चित्रपट देखील दिले आहे.