या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने खूपच ट्रान्सपरंट ड्रेस घालून केलं ‘बोल्ड’ फोटोशूट, दिसली जबरदस्त ‘फिगर’

जिथे मलायका अरोरा असते तिथे अन्य कोणाला लाईमलाईट मिळणे शक्यच नसते. अर्थात तिची स्टाईल आणि तिची फॅशन यांचा जलवाच इतका जबरदस्त आहे की वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर असून सुद्धा ती अन्य अभिनेत्री आणि मॉडेल्सना तगडी टक्कर देते. पण नुकतच झले असे की मलायका एका 25 वर्षीय अभिनेत्रीसमोर काहीशी फिकी पडली.

एरव्ही अशा अभिनेत्री तिच्या समोर झाकोळल्या जातात पण यावेळी मात्र या अभिनेत्रीने मलायकाची लाईमलाईट हिरावून घेतली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून होती अनन्य पांडे! आताच्या सर्वात प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक होय. पण अनन्याने असा कोणता लुक परिधान केला होता की चक्क तिच्यासमोर बोल्डनेस आणि हॉटनेसची देवी मलायका कमी पडली बरं? चला जाणून घेऊया!

त्याच झालं असं की अपूर्व मेहताने एक स्टार स्टेड पार्टी ऑर्गनायझ केली होती आणि त्या पार्टी मध्ये अनन्याची एन्ट्री होताच सर्व नजरा तिच्याकडे वळल्या आणि तिच्यावर स्थिरावल्या इतकी ती सुंदर दिसत होती. या पार्टी लुकसाठी तिने एक असा ड्रेस निवडला होता जो पाहून कोणीच तिला दुर्लक्ष करू शकलं नसतं.

तिने या पार्टीसाठी काळ्या रंगाचा शियर ड्रेस परिधान केला होता, ज्यावर ग्लिटर आणि स्पार्कल काम दिसून येत होते. अनन्याने हा ट्रान्सपरंट गाऊन फॅशन लेबल Aadnevik मधून पिक केला होता आणि हा लुक तिचे स्टाईल स्टेटमेंटच बनून गेला. अनन्याने जो स्लीव्हलेस ड्रेस परिधान केला होता त्यावर लेस वर्क दिसून येत हते.

तर डीप यू नेकलाईनमुळे तिच्या लुक मध्ये सेक्सीनेस अॅड होत होता. फिगर हगिंग असणा-या या आउटफिटमध्ये कंबरेवर एक लेदर बेल्ट दिला होता ज्यामुळे तिची टोन्ड ऐब्डमन सहज हायलाईट होत होती. बॉटम एरिया मध्ये या शियर ड्रेस मध्ये थाई-हाई स्लिट दिले होते. यामुळे अनन्याचे टोन्ड लेग्स मस्त फ्लॉन्ट होत होते आणि एकंदर लुक अधिक जास्त लक्षवेधी झाला होता.

अनन्याच्या या शिमरी ड्रेसमध्ये बॅकला कटआउट डिटेलिंग दिली होती, ज्यात ती बॅकलेस पोझ मारताना दिसत होती. गाऊन वर दिसून येणारी जियोमेट्रिकल डिजाइन आणि ऐम्बेलिशमेंटमुळे ती खूप जास्त अॅक्टीव्ह दिसत होती.

आपल्या हा हॉट लुकला कम्पलिट करण्यासाठी अनन्याने स्मोकी आईज, विंग्ड आईलाइनर, कोरल पिंक लिप्स, ब्लश्ड चीक्स आणि बीमिंग हाईलाइटसोबत केसांना हेवी कर्ल्स मध्ये मोकळे सोडले होते. यामुळे ती जणू अप्सराच भासत होती आणि तिचे नैसर्गिक सौंदर्य अधिक खुलून आले होते.

अनन्यासारखाच मलायकाने सुद्धा असा लुक गेल्या काही दिवसांत कॅरी केला होता. तिने देखील काळ्या रंगाचा बॉडीसूट परिधान केला होता. ज्यावर तिने शियर फेब्रिकचा हेवी एम्ब्रॉइडरी गाउन परिधान केला होता. या शिमरी ड्रेसमध्ये वन-शोल्डर पॅटर्न दिला गेला होता जो एक प्रकारे फिगर हगिंग आउटफिटच होता. त्यात नुडल्स सारख्या स्ट्रेप्स आणि आरपार दिसणाऱ्या कपडयांमध्ये मलायका आपले टोन्ड लेग्स बिनधास्त फ्लॉन्ट करत होती.