3 अफेअर्स आणि 1 लग्न करून ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्रीने खरं प्रेम नशिबात नसल्याची व्यक्त केली खंत.. सगळे पुरुष सारखेच म्हणत-

बॉलिवूडच्या चंदेरी दुनियेत अशी अनेक रहस्ये दडलेली आहेत, ज्याची प्रेक्षकांना कल्पना देखील नाहीये. हे जग बाहेरून जितके सुंदर दिसते आतून मात्र तसे नाहीये हे सर्वांनाच माहीत आहे. बॉलिवूडमधील प्रत्येक अभिनेता-अभिनेत्रीची स्वतःची एक स्टोरी आहे. ज्या बर्‍यापैकी प्रसिद्ध आहेत.

आपणा सर्वांना ठाऊकच आहे की बॉलिवूडमध्ये बरीच ह्रदये जोडली गेली आहेत आणि तितकीच तुटलेली देखील आहेत. काही जोडप्यांचे अफेअर इतके गाजले होते की ते मीडियामध्ये बराच काळ चर्चेचा विषय ठरले होते. पण काही प्रेम प्रकरण असेही राहिले आहेत ज्याची प्रेक्षकांना खबरही नव्हती. आज आपण अश्याच एका प्रेम अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत

आम्ही बोलत आहोत एकेकाळची टॉपची अभिनेत्री अमृता सिंग बद्दल. अमृता ही आपल्या सुंदरतेमुळे तर प्रसिद्ध होतीच शिवाय तिने तिच्या अभिनयाने देखील लाखो प्रेक्षकांचे मन जिंकले होते. त्या काळात फक्त प्रेक्षकच नव्हे तर अनेक बॉलिवूड कलाकार देखील अमृताच्या प्रेमात वेडे झाले होते.

आपल्या सर्वांनाच माहीती आहे की सैफ अली खानने 1991 मध्ये अभिनेत्री अमृता सिंगसोबत लग्न केले होते. जेव्हा दोघांचे लग्न झाले तेव्हा सैफ चे वय मात्र 21 वर्षे होते. तर अमृता मात्र तेव्हा 33 वर्षांची होती. म्हणजेच अमृता ही सैफ पेक्षा तब्बल 12 वर्षे मोठी होती. अमृता सिंगबद्दल बोलायचे झाले तर ती तिच्या काळातील टॉप अभिनेत्रींच्या यादीमध्ये होती.

तिने बॉलिवूडमधील बर्‍याच सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केले. पण ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीत आहे की सैफ हा तिच्या आयुष्यातील पहिला अभिनेता नव्हता. त्याआधीही तिचे नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आले होते. आज आपण अशाच काही अभिनेत्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांच्यासोबत अमृताचे नाव जोडण्यात आले होते.

१९५८ मध्ये जन्मलेल्या अमृता सिंगने आपल्या बॉलिवूड कारकिर्दीची सुरूवात बेताब चित्रपटातून केली होती. हा चित्रपट १९८३ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि सनी देओल यात दिसला होता. चाहत्यांना सनी आणि अमृताची केमिस्ट्री आवडली. तर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला आणि अमृता रातोरात सुपरस्टार झाली.

बेताब चित्रपटाविषयी असे म्हणतात की या चित्रपटात बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांनी स्वत: अमृता सिंगच्या विरुद्ध आपला मुलगा सनी देओल यांना कास्ट केले होते. सन 1984 मध्ये बेताबनंतर अमृता सिंगने ‘सनी’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटातही अमृताच्या विरुद्ध सनी देओल हीरो होता.

सलग दोन चित्रपट एकत्र काम केल्यानंतर या दोघांची चांगलीच ओळख झाली. सुरुवातीला दोघेही खूप चांगले मित्र झाले आणि हळूहळू दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात होते त्यामुळे त्यांनी प्रेमाच्या फंद्यात न पडता आपल्या करिअरवर फोकस करण्याचं ठरवलं. त्यामुळे हे प्रेम फार काळ टिकले नाही आणि लवकरच दोघांचेही ब्रेकअप झाले.

क्रिकेट आणि बॉलिवूडमधील नातं खूप जुनं आहे. बऱ्याच क्रिकेटर्सनी बॉलिवूड सुंदर्यांसह लग्न केले आहे. एक काळ असा होता की रवि शास्त्री देखील अमृता सिंगसोबत प्रेमात असल्याची चर्चा होती. असे म्हणतात की या दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता, परंतु अचानक त्यांच्या नात्यात पेच निर्माण झाला आणि ते लग्न करू शकले नाहीत.

यानंतर, जेव्हा ती करिअरच्या शिखरावर पोहोचली तेव्हा तिने सैफशी लग्न केले. 1991 मध्ये अमृताने आपल्यापेक्षा 12 वर्षांनी लहान असलेल्या सैफशी लग्न केले. तर सैफ आणि अमृताला सारा आणि इब्राहिम ही दोन मुलं झाली. दोघांनी 2004 मध्ये एकमेकांसोबत जवळपास 13 वर्षे राहिल्यांनंतर घट-स्फो-ट घेतला

घटस्फोटानंतर सैफ आपल्या आयुष्यात पुढे गेला आणि करिना कपूरबरोबर लग्न केले, तर अमृताने अविवाहित जीवन जगण्याचा निर्णय घेतला आणि तिने पुन्हा कधीही लग्न केले नाही आणि आपल्या दोन मुलांना एक सिंगल मदर म्हणून वाढवले. एका मुलाखतीत तिला तिच्या आयुष्याबद्दल विचारले असता तिने म्हटले होते की तिला आयुष्यात खरे प्रेम मिळू शकले नाही. सगळेच पुरुष धोखेबाज असतात असेही तिने यापुढे नमूद केले.