आलियाने आपल्या वडिलांसमोरच सांगितला आपल्या पहिल्या किस चा किस्सा.. कसे पुरुष आवडतात याबाबतही केला खुलासा..

दिग्दर्शक अनुराग कश्यप हे बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. अनुराग यांची मुलगी आलिया कश्यप कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असते. आलिया बॉयफ्रेण्ड शेन गेग्रोअरसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

एवढंच नाही तर बऱ्याच वेळा ती खासगी आयुष्याबद्दल सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगताना दिसते. दरम्यान, यावेळी आलियाने तिच्या आणि शेनच्या पहिल्या किसविषयी सांगितलं आहे.

आलियाने तिच्या युट्युब चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओत तिने तिच्या पहिल्या किसविषयी सांगितले आहे. आलिया आणि शेनची भेट ही एका डेटिंग अॅंपवर झाली होती. एकदा राइट स्वाइप केल्यानंतर त्यांची भेट झाली. 

त्यानंतर दोन महिने त्यांनी चॅटींग केली. आलिया आणि शेन दोघांनी भेटण्याची घाई केली नाही.दोन महिने चॅटींग केल्यानंतर त्यांनी भेटायचे ठरवले. ते फक्त भेटले नाही तर त्यांनी पहिल्यांदा किस देखील केलं.

“मी वाट पाहतं होते की शेन आता मला किस करेल, आता नाही नंतर तरी करेल पण तसं झालं नाही. कदाचित त्याला वाटलं की मी गोंधळून जाईल किंवा मला आवडणार नाही,” असं आलिया म्हणाली.

आलिया पुढे म्हणाली, “मी खूप वेळ वाट पाहिली आणि शेवटी मी ठरवलं आता मीच किस करते. ते किस पण खूप विचित्र होतं. शेन माझ्याशी बोलत होता आणि मी अचानक त्याला किस केलं. कारण बराच वेळ मी या गोष्टीवर विचार करत होती शेवटी मी किस केलं.”

पुढे तिला कसे पुरुष आवडतात हे देखील आलियाने सांगितलं. आलिया म्हणाली, “जे पुरुष मला हसवू शकतात. ज्यांच्यासोबत रहायला मला विचित्र वाटणार नाही. ती व्यक्ती सगळ्यांसोबत कशी वागते हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.”

.