‘या’ कारणामुळे आलिया घाबरते वडील महेश भट्ट यांच्या दिग्दर्शनात काम करायला.. उगाच जवळीक साधण्याचा करतात प्रयत्न..

बॉलिवूडची सध्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्री आलिया भट्ट ही सर्वांच्याच हृदयावर राज्य करते आहे. सर्वसामान्य चाहतेच नाही तर रणबीर कपूर सारखा बॉलीवूड अभिनेता देखील आलियाच्या प्रेमात पडला आहे. इतकी भुरळ आलियाने आपल्या सौंदर्य आणि अदाकारीने तरुणांच्या मनावर घातली आहे.

आलिया भट्ट ही एक उत्कृष्ट अभिनेत्री तर आहेच तसेच ती आता बॉलिवूडमध्ये एक उत्तम गायिका म्हणून देखील नावारूपास येत आहे. भट्ट कुटुंबात जन्मलेली आलिया चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी रझदान यांची मुलगी आहे. आलियाने 1992 च्या थरारक संघर्ष या चितपटातून बाल कलाकार म्हणून अभिनयात पदार्पण केले.

आलियाने संघर्ष मधून जरी बालकलाकार म्हणून पदार्पण केलं असले तरी तिने मुख्य अभिनेत्री म्हणून करण जोहरच्या रोमँटिक चित्रपट ‘स्टुडंट ऑफ द इयर’ मधून २०१२ मध्ये प्रथम भूमिका केली. या भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर अवॉर्ड नामांकन देखील मिळालं होतं.

आलिया आपल्या सौंदर्यामुळे तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय आहे. तिचे लाखो चाहते आहेत, त्यात सामान्य तरुण तर आहेतच शिवाय अनेक अभिनेते देखील आहेत. अलीकडेच, 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या राझी चित्रपटाने 1 अब्जाहून अधिक कमाई केली, जी एक स्त्रीपात्राभिमुख फिल्म होती. या चित्रपटाच्या कमाईवरून हिंदी चित्रपटसृष्टीत आलियाचे असलेले वर्चस्व दिसून येते.

आलिया भट्ट सध्या खूप चर्चेत आहे ते म्हणजे बॉलिवूड मध्ये सुरू असलेल्या नेपोटीझम च्या मुद्द्यावरून. अलीयाचा चित्रपट गली बॉय मागील वर्षी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता आणि बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची बरीच प्रशंसा झाली. दुसरीकडे, जर तिच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे असेल तर लवकरच ती अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्र, महेश भट्ट यांचा चित्रपट सडक 2 मध्ये काम करणार आहे.

परंतु नुकत्याच आलियाने दिलेल्या एका मुलाखतीनुसार हे उघड झाले आहे की आलिया आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास घाबरत आहे. आता तुम्ही असा विचार कराल की यामागचे कारण काय आहे, तर स्वत: आलियाने याबाबत खुलासा केला आहे, ती म्हणाली की “आत्ता मला माझ्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्यास भीती वाटते.

सध्या ते सतत माझे काम पहात आहेत आणि असे सांगत आहे की मलाही तुझ्यासोबत एखादा चित्रपट करावा लागेल. त्यांचे डोळे एक्स-रे व्हिजनसारखे आहेत. ” आलियाचा कलंक चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. कलंक चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर आलियाने लगेचच सडक -2 चे शूटिंग सुरू केले. सडक-2 चा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता ज्याची सोशल मीडियावर भरपूर टीका झाली.

आलिया पुढे म्हणाली, “मी नेहमीच माझ्याभोवती भिंत बांधली आहे आणि लोकांना ती ओलांडू देत नाही. माझे वडील ती भिंत मोडण्याची प्रतीक्षा करीत आहेत त्यामुळे मला थोडी भीती वाटली आहे पण मला वाटते की ते नक्कीच मजेदार असेल. आम्ही लवकरच सडक ची शुटिंग संपवणार आहोत. ” या चित्रपटात आलिया तिची मोठी बहीण पूजा भट्ट सोबत सडक -2 मध्ये काम करताना दिसणार आहे.