विश्वसुंदरी ऐश्वर्या पुन्हा प्रेग्नंट ? व्हायरल फोटोंमुळे आलंय चर्चेला उधाण

विश्वसुंदरी ऐश्वर्या आपल्या हटके स्टाईलसाठी खूप प्रसिद्ध आहे. ऐशच्या फॅशन आणि स्टाईलचा जलवा फक्त बॉलीवुड पार्टी, इव्हेंट्स आणि केवळ भारतात पाहायला मिळतो असं नाही.

सातासमुद्रापार फिल्म फेस्टिव्हल मध्येही ऐशने आपल्या हटके फॅशन आणि स्टाईलने हॉलीवुडच्या मंडळींची आणि जगभरातील रसिकांची मने जिंकली आहेत. नेहमीच बच्चन बहू ऐश्वर्या आपल्या फॅशन आणि महागड्या स्टाईल स्टेटमेंटमुळे प्रसिद्धीच्या झोतात असते. मात्र तिच्या ड्रेसिंग स्टाइलमुळे आता दुसरीच चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

ती जिथे जात आहे तिथे ती आता लुज कपडे परिधान करत असल्याचे पाहायला मिळत आहे. ति पोट लपवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चा रंगत आहेत. अशाप्रकारच्या ड्रेसिंगमुळे ऐश्वर्या दुस-यांदा आई बनणार आहे का ? व ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्याची बदलेली स्टाइल पाहूनच तिच्या चाहत्यांना हा प्रश्न पडणार स्वाभाविक आहे.

तुर्तास यावर ऐश्वर्याकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण आलेले नाही. या बातम्यांमुळे तिच्या डोहाळे जेवणाचे जुने फोटोही व्हायरल झाले आहे. आराध्याच्या जन्माआधी जलसावर जल्लोष करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी ऐश्वर्या आणि अभिषेकला आशीर्वाद, शुभेच्छा देत गिफ्टही दिलं. सायरा बानू यांनी ऐशच्या सौंदर्याचे गोडवे गात तिला एक ‘सोन्याचं नाणं’ भेट दिलं.

‘निबुडा निबुडा’, ‘ताल से ताल’ अशा वेगवेगळ्या गाण्यांवर ऐशला थिरकण्याचे धडे देणा-या दिवंगत सरोज खान बॉलिवुडकरांचा जलसा पाहून भारावून गेल्या होत्या. पहिल्यांदाच हिंदी चित्रपटसृष्टीतील इतक्या महिला सेलिब्रेटींना एकत्र पाहिल्याचं त्यांनी अनुभवलं. डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमा निमित्त जलसावर जल्लोष करण्यात आला होता.

इतकंच नाहीतर ऐशसुद्धा आई होण्याचा आनंद लपवू शकली नाही. ‘सौंदर्यखणी’ ऐश्वर्या कोडकौतुकात हरखून गेली होती. बॉलिवुड करांचा हा जलसा तब्बल तीन तासाहून अधिक काळ रंगला.