ऐश्वर्या राय’ नाव ऐकूनच अजूनही सर्वांच्या डोळ्यासमोर एक स्वप्न सुंदरी तरळते ना.. भारतातच नाही तर आज अख्ख्या जगात ऐश्वर्या राय हे एक मोठे नाव आहे. 1994 मध्ये विश्व सुंदरीचा खिताब जिंकणारी ऐश्वर्या सर्वांनाच हवीहवीशी होती. पण अखेर तिने अभिषेक बच्चनशी लग्न केले आणि बच्चन कुटुंबाची सून झाली.
मणिरत्नम यांच्या ‘इरूवर’ चित्रपटातून ऐश्वर्या रायच्या रूपेरी कारकिर्दीस सुरुवात झाली. बॉबी देवलसोबतचा ‘और प्यार हो गया’हा तिचा पहिला हिंदी चित्रपट. विश्वसुंदरीचा किताब पटकावणारी ऐश्वर्या रॉय बच्चनचे करोडो चाहते आहेत. ऐश्वर्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकीच तिची पर्सनल लाईफदेखील नेहमीच चर्चेत राहिली.
ऐश्वर्याचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले आणि तिचे नाव सलमान खानशी जोडले गेले. हम दिल दे चुके सनम या चित्रपटाच्या सेटवर ही प्रेमकहानी फुलली होती. पण काहीच वर्षांत त्यांचे ब्रेकअप झाले.
ऐश्वर्या राय मॉडेलिंग करत असताना ती राजीव मूलचंदानीसोबत रिलेशनशीपमध्ये होती हे खूप कमी जणांना माहिती आहे. ऐश्वर्याने हे रिलेशनशीप कधीच मीडियात कबूल केले नाही. राजीव हा त्याकाळात अतिशय प्रसिद्ध मॉडेल होता.
बॉलिवूडमध्ये ऐश्वर्याला जसे यश मिळाले तसे तिने राजीवला टाळायला सुरुवात केली असे म्हटले जाते. राजीवनंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात सलमानची एंट्री झाली आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. सलमानशी ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक आला पण हे नातंसुद्धा खूप काळ टिकले नाही.
सलमानपासून दूर झाल्यानंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय ची एन्ट्री झाली. सलमानसोबत प्रेमात फसवणूक झाल्यानंतर विवेक सोबत ऐश्वर्या प्रेमात पडली. दोघांनी मिळून ‘क्यों हो गया ना’ हा चित्रपट देखील केला. या चित्रपटादरम्यान दोघे एकमेकांचे खूप जवळ आले.
अशा परिस्थितीत जेव्हा ऐश्वर्याचा 30 वा वाढदिवस आला तेव्हा विवेकने तिला एकाच वेळी 30 गिफ्ट देऊन तिला प्रभावित केले. मात्र, ऐश्वर्याने विवेक आणि त्याच्या नात्याबद्दल खुलेपणाने कोणालाही सांगितले नाही. पण त्या दिवसांत ती विवेकबरोबर प्रत्येक फंक्शनमध्ये दिसली होती. दोघांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी सर्वच सिने रसिकांना त्यांचे हे प्रकरण माहीत झालं होतं.
ऐश्वर्याला वाईट काळातून बाहेर काढण्यासाठी मदत करावीशी वाटली, म्हणून विवेकने एका हॉटेलच्या खोलीत प्रेसच्या लोकांना बोलावले आणि सर्वांना सांगितले की, सलमानकडून त्याला जिवे मारण्याची धमकी दिली जात आहे. परंतु विवेकची ही युक्ती त्याला चांगलीच महागात पडली.
विवेकच्या या हालचालीने ऐश्वर्याने त्याच्यापासून वेगळे होण्यास सुरवात केली. अशा प्रकारे ऐश्वर्या रायने विवेकचा हात सोडला. इतकेच नव्हे तर विवेक आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता, परंतु आपल्या सलमान सोबत पेच पडल्यामुळे बरेच चित्रपट त्याच्या हातातून गेले. त्यादिवशी विवेकने ही पावले उचलली नसती तर कदाचित त्यांच्याकडे ऐश्वर्या आणि चांगली चित्रपट कारकीर्द दोन्ही असू शकले असते
त्यानंतर गुरुच्या सेटवर सुरु झाली ती ऐश्वर्या आणि अभिषेकची लव्हस्टोरी. गुरू सिनेमाच्या प्रीमियरनंतर टोरंटोमध्ये अभिषेकने लग्नासाठी ऐश्वर्याला प्रपोज केले. ऐश्वर्याने ही अभिषेकने केलेले प्रपोजल लगेचच स्वीकारले आणि 2007 मध्ये दोघे लग्नाच्या बेडीत अडकले.

.